Disha Shakti

सामाजिक

मुंबई बांद्रे येथे प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न.

Spread the love

मुंबई कांदिवली पश्चिम / भारत कवितके : रविवार दिनांक २५ आगस्ट २०२४ रोजी सकाळी १०ते ५ वाजेपर्यंत या वेळेत मुंबई बांद्रे येथील नॅशनल लायब्ररी सभागृह, स्वामी विवेकानंद रोड, बांद्रे पश्चिम मुंबई ५०,या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील शिक्षक, कवी लेखक, संपादक, पत्रकार, नाट्य कलावंत,अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पुरुष व महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार २०२४ देऊन गौरविण्यात आले मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून फोटो ला हार अर्पण करण्यात आला व दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.

शालेय विद्यार्थीनींनी स्वागत गीत म्हटले.प्रा.नागेश हुलवले सरांनी संविधान उद्देशिका चे सामुहिक वाचन केले.आपल्या प्रास्ताविक मध्ये नागेश हुलवले सरांनी समिती च्या कार्याचा आढावा घेऊन सांगितले की,” जेवढे प्रस्ताव पुरस्कार साठी आले तेवढे सर्व आम्ही निवडले, महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातून जवळ जवळ १८० प्रस्ताव आले होते.पुरस्कार म्हणजे पाठीवर शाबासकीची थाप असते.पुरस्कार मुळे उर्जा मिळते.त्यातून राष्ट्रहिताची कामे होऊन प्रगती होते.” पाहुण्यांचा परिचय करून सत्कार करण्यात आले.पाहुण्यांचे मनोगत, पुस्तक प्रकाशन सोहळा व पुरस्कार वितरण सोहळा असे विविध कार्यक्रम संपन्न झाले.

पदमश्री डॉ.यादव सरांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी विनोदी शैलीत, उपदेशपर भाषण करून सर्वांना हसविले.डेरिक एंजल्स नासा शास्त्रज्ञ यांनी मोलाचा सल्ला दिला की” तुम्ही सर्वांनी सिडी होऊन येणाऱ्या पिढीला घडवा,” प्रहार चे संपादक सुस्कृत खांडेकर यांनी राजकीय विषयांवर सखोल अभ्यास पूर्ण भाषण करुन सत्ता साठी हपापलेले मंत्री यांचे वर टीका केली व लोकशाही बदल खंत व्यक्त केली.अध्यक्ष बाळासाहेब तोरसकर यांचे अध्यक्षीय भाषण ही मार्गदर्शन करणारे होते.या पुरस्कार सोहळ्यात मुंबई कांदिवली पश्चिम येथील कवी लेखक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांना जेष्ठ आदर्श पत्रकार प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.आयोजन कमिटी मधील पडद्या मागील भूमिका करणारे सर्वांच्या परिचयाचे कवी लेखक गीतकार दिग्दर्शक प्रमोद सूर्यवंशी हे उपस्थित मान्यवर पुरस्कारर्थी यांची आत्मतेने, आपुलकीने विचारपूस करीत होते.या प्रसंगी सूत्रसंचालन ची बाजू योगिता, योगेश व वैशाली यांनी भक्कम पणे सांभाळली.

या प्रसंगी बाळासाहेब तोरसकर, सर्जेराव पाटील,प्रा.नागेश हुलवले, रमेश पाटील, प्रमोद सूर्यवंशी, योगेश हरणे,व इतर मान्यवर उपस्थित होते.
भारत कवितके मुंबई कांदिवली


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!