शिर्डी प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी व श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती (मुंबई) जयपूर यांचे संयुक्त विद्यमाने ०५ वर्षानंतर पुन्हा एकदा मोफत कृत्रीम पायरोपण (जयपूर फुट) शिबीर व गरजु दिव्यांगासाठी साहित्य वाटप दिनांक दि.२६/०९/२०२४ ते दि.३०/०९/२०२४ या दरम्यान करणेत येणार आहे. सदर शिबीरामध्ये गरजु व लाभार्थी दिव्यांग व्यक्तींची तपासणी करणेत येऊन आवश्यकतेनुसार दिव्यांग व्यक्तीच्या पायाचे माप घेऊन त्या मापाचे कृत्रीम पाय रोपण करण्यात येणार आहे. नवीन पाय बसविणे बरोबर जुन्या कृत्रीम पायाची दुरुस्ती देखील सदर शिबीरामध्ये मोफत करण्यात येईल.
याचबरोबर दिव्यांगांकरीता आवश्यक साहित्याचे वाटप देखील शिबीर कालावधीत करण्यात येणार आहे. सदर शिबीरात येणा-या सर्व शिबीरार्थीना श्री. साईबाबा संस्थान मार्फत राहण्याची व दोन वेळच्या जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गोरक्ष गाडीलकर साहेब राहता तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन भन्साळी तालुका उपाध्यक्ष सुनील आरणे शहराध्यक्ष कैलास यादवडे यांनी केले आहे
शिबीरासाठी येताना सोबत आधार कार्ड किंवा सरकारी अन्य ओळखपत्र आणि ०२ पासपोर्ट साईज फोटो घेवुन यावेत.
नावनोंदणी करीता खालील ठिकाणी संपर्क साधावा.
• श्री. साईनाथ रुग्णालय शिर्डी-०२४२३-२५८५५५• शिबीर स्थळ – श्री साईनाथ रुग्णालय, २०० रुम शिर्डी. तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर
साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डी व श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती (मुंबई) जयपूर यांचे संयुक्त विद्यमाने मोफत जयपुर फूट शिबिराचे आयोजन

0Share
Leave a reply