राहाता प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : गेल्या काही दिवसांपासून नांदूर गाव विकासाच्या बाबतीत खूप प्रगतशील आहे. मोठ्या प्रमाणात नांदूर गावाचा विकास होतं आहे. परंतु कित्येक दिवसापासून लक्ष वेधनारी गोष्ट म्हणजे प्राथमिक शाळेपासून 500 मी अंतरामध्ये दारू व्यवसाय, गुटखा, जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जातं असून या गैरप्रकाराला नागरिक त्रस्त झाले असून या सर्व गोष्टीवर ग्रामपंचायत, श्रीरामपूर पोलीस स्टेशन व पोलीस अधीक्षकांचे दुर्लक्ष होतं आहे. त्याचं बरोबर दुकानातून सिगारेट घेऊन शाळेच्या आवारात फिरताना देखील खूप जण दिसत आहे.
यासर्व अवैध धंद्यावर लक्ष देऊन लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी व हे सर्व गैरप्रकार बंद करण्यात यावे. ग्रामपंचायती बरोबर शाळेच्या आवारात देखील सी सी टीव्ही कॅमेरा लावण्यात यावे जेणेकरून यासर्व गोष्टीकडे लक्ष राहिलं.शाळेच्या आवारात फक्त शालेय वस्तू,किराणा दुकान, शिक्षणासाठी व प्राथमिक उपचारासाठी आवश्यक सर्व गोष्टी या अंतरावर उपलब्ध व्हावी असे ग्रामस्थ यांच्याकडून मागणी होतं आहे.
नांदूर गाव बनले दारू,गुटखा, सिगारेट व जुगारांचा अड्डा ग्रामपंचायत,श्रीरामपूर पोलिस स्टेशन व पोलीस अधीक्षकांचे दुर्लक्ष….

0Share
Leave a reply