राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : शनिवारी 31 ऑगस्टच्या रात्री राहुरी-सोनई महामार्गलगतच्या ब्राम्हणीतील मोकाटे-गायकवाड वस्ती,पटारे वस्ती व खोसे वस्ती परिसरात अचानक घिरट्या घालणाऱ्या ड्रोनने अनेकांच्या झोपा उडवल्या. रात्री अचानक ड्रोन घरांवरती घिरट्या घालताना आढळून आले असता अनेकांनी एकमेकांना फोन, व्हाट्सअपच्या माध्यमातून याची कल्पना दिली.
रात्री 12 च्या दरम्यान सदर ड्रोन गायब झाल्याची माहिती सकाळी स्थानिकांनी दिली. दुसऱ्या दिवशी पुन्हा ड्रोन फिरतय का? असा प्रश्न पडला.पण दुपार पासून रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू राहिल्याने ड्रोन आज दिसणार नसल्याच लक्षात घेता लोक बिनधास्त पणे झोपी गेले.पण शनिवारी रात्री फिरणाऱ्या त्या ड्रोनचा अद्याप तपास लागला नसल्याचे नागरिक अचंबित झाले असून प्रत्येकाने आपापल्या परीने अंदाज काढले. पण नेमकी विषय काय? रात्री कशासाठी घिरट्या घालत होते हे अद्याप अस्पष्ट होऊ शकले नाही.
रविवारी राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांना माहिती देऊन विचारणा केली असता त्यांनी आमच्याकडे ड्रोनबाबत कोणतेही कल्पना नसल्याचे व याबाबत कुणीही परवानगी घेतलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. सदर विषय पोलीस प्रशासनाला सूचित करून चौकशी बाबत कळविले जाईल. असे तहसीलदार नामदेव पाटील यांनी नागरीकांना सांगितले. याबाबत प्रशासनाने योग्य तपास करून माहिती घेवून प्रशासनाने यावर लक्ष घालण्याचे ग्रामस्थांनीआवाहन केले असून जेणेकरून चर्चेला पूर्णविराम मिळेल.
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे ड्रोनच्या रात्रीच्या घिरट्यांनी उडवली नागरिकांची झोप

0Share
Leave a reply