मुंबई कांदिवली पश्चिम / भारत कवितके : धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता सोमवार दिनांक 9 सप्टेंबर २०२४ पासून पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानात उपोषणाला बसलेल्या पाच मल्हार यौध्दे ची मुंबई कांदिवली पश्चिम येथील धनगर समाजातील जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
संविधाना मध्ये समाविष्ट असून सुद्धा धनगर समाजाच्या दोन तीन पिढ्या एसटी आरक्षणाच्या सवलती पासून वंचित आहेत.धनगर समाजाला जवळ जवळ सर्वच पक्षांनी फसविले आहे.आदमपूर येथील ओवीकारांनी प्रथम पारंपारिक पद्धतीने ओवी तून एसटी आरक्षण अमंलबजावणी करिता पांडुरंगाकडे साकडे घातले.वाजत गाजत सर्व जमलेल्या धनगर समाज बांधवांनी नामदेव पायरी जवळ जाऊन पांडुरंगाच्या चरणी निवेदन दिले.समाजातील अनेक मान्यवरांनी व्यासपीठावरून आपली मनोगते व्यक्त केली.प्रा.यशपाल भिंगे सर म्हणाले,” या आंदोलनाला राजकीय वास नाही, राजकीय घुसखोरी या ठिकाणी होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी खबरदारी घ्यावी.समाजातील कार्यकर्ते यांनी राजकीय नेतृत्व निर्माण करावे.” शेवटी पांडुरंग मेरगळ यांनी दिपक बोराडे, माऊली हळवणकर, विजय तमनर, गणेश केसरकर, योगेश धरम,या पाच उपोषण कर्त्याची नावे जाहीर करून उपोषणाला सुरुवात केली.
मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी उपोषण स्थळाला भेट देऊन उपोषण कर्त्याची चर्चा करून त्यांना शुभेच्छा दिल्या.सदर उपोषण आंदोलन सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने होत आहे.पांडुरंग मेरगळ, विजय गोफणे, बिरु कोळेकर,व इतर कार्यकर्ते या गेले दोन तीन महिने परिश्रम घेत आहेत.
साहित्यिक भारत कवितके यांनी पंढरपूर येथील उपोषण कर्त्या धनगर बांधवांची भेट घेऊन दिल्या शुभेच्छां

0Share
Leave a reply