Disha Shakti

राजकीय

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पारनेर तालुका अध्यक्षपदी संतोष तांबे तर उपाध्यक्षपदी वसंत रांधवण, सचिवपदी संतोष कोरडे यांची निवड

Spread the love

पारनेर प्रतिनिधी  / गंगासागर पोकळे : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची पारनेर तालुका कार्यकारीणीची निवड शुक्रवार दि.२१ जून रोजी सायंकाळी ५ वाजता शासकीय विश्रामगृह पारनेर येथे करण्यात आली.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पारनेरची बैठक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी संघटनेच्या विविध पदांसह कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.तालुकाध्यक्ष संतोष तांबे यांनी हि कार्यकारीणी जाहीर केली.त्यानंतर जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे यांचे हस्ते पदाधिकार्‍यांना निवडीची पत्रं देण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन,जिल्हासचिव सुरेश खोसे उपस्थित होते.

यावेळी संघटनात्मक बांधनीसाठी सर्व पदाधिकार्‍यांनी वेळ द्यावा आणि प्रामाणिक,सर्वसमावेश्यक बातमीदारी करुन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय द्यावा.योग्यवेळी तळागाळातील पत्रकाराला संकटकाळामधे संघटनेची मदत तत्काळ व्हायला हवी.पत्रकारांचे सुखदु:खात सर्व पदाधिकार्‍यांनी हजर राहून त्यांना मदत केली पाहीजे. पत्रकारांसाठी विविध कार्यक्रम राबवुन आपल्या कामाची चुनुक प्रत्येकाने दाखविली पाहीजे असे आवाहन जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची पारनेर तालुका कार्यकारीणी खालीलप्रमाणे,

१)संतोष तांबे – अध्यक्ष
२)संतोष कोरडे-सचिव
३) वसंत रांधवण – उपाध्यक्ष
४)विशाल फटांगडे-उपाध्यक्ष
५)ठकसेन गायखे – उपाध्यक्ष
६)नितीन परंडवाल – खजिनदार
७)महेश शिंगोटे – इलेक्ट्राॅनिक मिडीया प्रमुख
८)चंद्रकांत कदम – प्रसिध्दी प्रमुख
९)सुदाम दरेकर – संपर्क प्रमुख
१०)सचिन जाधव – निघोज शहर प्रमुख
११) ऍड. सोमनाथ गोपाळे – सह सचिव
सर्वश्री सदस्य :
१२)गंगाधर धावडे – सदस्य
१३)रामदास नरड – सदस्य
१४)सुधिर पठारे – सदस्य
१५)सदानंद सोनावळे – सदस्य
१६)संपत वैरागर – सदस्य
१७)संदिप गाडे – सदस्य
१८)भगवान श्रीमंदिलकर – सदस्य
१९)भगवान गायकवाड – सदस्य
२०)प्रविण वराळ – सदस्य
मार्गदर्शक :
२१)वसंत मुंडे – प्रदेशाध्यक्ष
२२)संजय भोकरे – प्रदेश संघटक
२३)डाॅ.विश्वासराव आरोटे – प्रदेश सचिव
२४)दत्ता गाडगे – जिल्हाध्यक्ष
२५)सुरेश खोसे – जिल्हासचिव
२६)रामचंद्र सुपेकर – पत्रकार


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!