दिशाशक्ती तुळजापूर / चंद्रकांत हगलगुंडे : अणदूर येथील महादेव गणेश तरुण मंडळाच्या श्रीची जय मल्हार पत्रकार संघाकडून पूजा तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील मानाचा व पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत तब्बल 66 वर्षापासून प्रसिद्ध असलेल्या महादेव तरुण मंडळाच्या गणेशाची पूजा व महा आरती जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने मोठ्या भक्ती भावाने करण्यात आली. या पूजेचे पौराहित्य गणेश स्वामी यांनी केले. एमजी ग्रुपच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्री गणेशा 66 वर्षांपूर्वी विश्वनाथ घुगरे वस्ताद यांनी आपल्या सहकार्यासह महादेव मंदिरात बाप्पांची स्थापना केली. निळकंठेश्वर मठाचे मठाधिपती शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे यशस्वी व समाज उपयोगी उपक्रमाचे वाटचाल चालू आहे.
या मंडळात 150 हून अधिक युवकांचे फौज असून विविध धार्मिक कार्यक्रम, शिस्तबद्ध यंत्रणा, काटेकोर व पारदर्शक कारभार यामुळेच या मंडळाचे सर्वत्र कौतुक केले जाते. मंडळाच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळा, रक्तदान शिबिर, स्वतंत्र वाचनालय, निळकंठेश्वर मठातील वर्षभर होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमात सहभाग अशा स्तुत्य उपक्रमाने मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे.
यावेळी पत्रकार संघाचे श्रीकांत अणदूर कर, शिवशंकर तिरगुले, दयानंद काळुंखे, चंद्रकांत गुड, संजय आलूरे, सचिन तोग्गीं, चंद्रकांत हगलगुंडे उपस्थित होते. महादेव तरुण मंडळाचे उमाकांत आलुरे, श्रीशैल लंगडे, श्रीनाथ मुळे, विजय स्वामी, सुनील कस्तुरे, प्रसन्न कंदले,अतुल कस्तुरे, मुकेश घुगरें, रामेश्वर कल्याणी, अनिल स्वामी सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अणदूर येथील महादेव गणेश तरुण मंडळाच्या श्रीची आरती जय मल्हार पत्रकार संघाकडून संपन्न

0Share
Leave a reply