दिशाशक्ती राहुरी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील जांभळी येथील बन्सीची वाडी येथे राहणारा अनिल चिमाजी आघान (वय २२) हा तरुण मुळा धरणाच्या बॅक वाटरमध्ये येणाऱ्या काळू नदीत काल २४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता वाहून गेला आहे. कालपासून ते आज उशिरापर्यंत त्याचे शोधकार्य सुरू होते. तो वनकुटे (ता. पारनेर) हद्दीतील काळुची वाडी येथे नातलगांकडे गेला होता.
काल दुपारी ३ वाजता परतीच्या मार्गावर असताना अंघोळीसाठी पुलावरून पाण्यात उडी घेतली. परंतु प्रवाह अधिक असल्याने त्याने आरडाओरडा केला. काही तरुणांनी ते पाहून पाणबुड्यांना बोलावले. सुनील आघान, सुभाष केदार, संदीप भले यांनी पाण्यात उडी घेऊन अनिलला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. वावरथचे माजी सरपंच ज्ञानेश्वर बाचकर, जांभळीचे सरपंच शौकत शेख यांनी प्रशासनाला माहिती दिली. सागर बाचकर, किरण जाधव यांसह वावरथ, जांभळी परिसरातील तरुण कालपासून त्याचा शोध घेत आहेत मात्र आज दुपारपर्यंत शोधकार्य सुरू असताना त्याचा शोध लागलेला नाही.
जांभळी येथील तरुण गेला मुळा धरणाच्या बॅक वाटरमध्ये येणाऱ्या काळू नदीत वाहून, काल दुपारपासून शोधकार्य सुरू

0Share
Leave a reply