Disha Shakti

इतर

चंदनापुरी घाटात अपघात एक तरुण जागीच ठार

Spread the love

अ.नगर प्रतिनिधी / शेख युनूस : संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाट माथ्यावरील पोखरी फाट्यावर मोटर सायकल अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १७ मे रोजी सकाळी 7 वाजच्याच्या दरम्यान घडली आहे.

पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सकाळी ७ वाजताच्या दरम्यान पुण्याहून संगमनेरच्या दिशेने जाणारा ४० वर्षीय तरुण वरून राजेंद्र दिघे राहणार दिघे वस्ती, सोनगाव धानोरे ,तालुका राहुरी हल्ली राहणार पुणे हा तरुण आपल्या होंडा कंपनीच्या हॉरनेट मोटासायकल क्रमांक एम एच १७ सी क्यू ३२०३ वरून प्रवास करत होता.

सकाळी हा तरुण चंदनापुरी घाट माथ्यावरील पोखरी फाट्याजवळील कॉर्नरवर आला असतां मोटरसायकल वरील ताबा सुटल्याने रत्याच्या बाजूला असलेल्या सुरक्षा कठड्याला जाऊन धडकला या भिषण अपघातात त्यास गंभीर दुखापत झाल्याने या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सदर अपघाताची माहिती मिळताच महामार्ग प्रशासनाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस हेड कॉन्स्टेबल पंढरीनाथ रामनाथ पुजारी व भारत बादशहा गांजवे, नारायण ढोकरे यांनी घटना स्थळावर धाव घेतली. व मदत कार्य सुरू केले.परंतु काळाच्या ओघाने या तरुणाने आपला जीव गमावला होता.यानंतर घारगाव पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक संतोष खेडकर ,पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष फड , महादेव हांडे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे.शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

या दरम्यान पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वाहन धारक सर्रास वाहतूक नियमांचे उल्लघण केले जात असल्याने अपघाताच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. सिट बेल्ट न लावणे, हेल्मेटचा वापर न करणे अशा अनेक कारणांनी प्रवशांना दुर्दैवाने आपला जीव गमवावा लागत आहे.या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कदाचित हेल्मेट वापरले असते तर या तरुणाचा जीव वाचला असता म्हणून वाहन धारकांनी नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करणे गरजेचे आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!