राहुरी प्रतिनिधी / आर.आर.जाधव : श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात काल सायंकाळी मांजरी येथील महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी राहुरी पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान मुरकुटे यांना श्रीरामपूरातील त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेत याप्रकरणी अटक केली आहे. राहुरी तालुक्यातील एका महिलेने अत्याचार प्रकरणी सोमवारी दि. ७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी फिर्याद दाखल केली होती. राहुरी पोलीस ठाण्यात त्यांचे विरुद्ध गु रजि नं १०७०/ २०२४ भादवि कलम ३७६ ( 2 N ), ३२८, ५०६ , ४१८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून मुरकुटे हे रात्री उशिरा श्रीरामपूर शहरात दाखल झाले. ते कामानिमित्त मुंबई येथे गेले होते रात्री उशिरा १.३० चे दरम्यान राहुरी पोलिस त्यांच्या निवासस्थानी आले.
यानंतर चौकशीनंतर अटक करण्यात आली. अटकेनंतर रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याची त्यांनी तक्रार केली. त्यानंतर त्यांचेवर वैद्यकीय उपचार करण्य आले सदर प्रकार सन २०१९ ते २०२३ मध्ये घडलेला आसुन या दरम्यान सदर फिर्यादी महिलेस जमिन व घर घेऊन देतो असे अमिष दाखवून अहिल्यानगर, मुंबई दिल्ली विविध ठिकाणी नेऊन वेळोवेळी आत्याचार करण्यात आला अशी माहिती सूत्रांकडून मिळाली असुन त्यामुळे राजकिय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल ; राहुरी पोलिसांनी मध्यरात्री केली अटक

0Share
Leave a reply