राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : प्रस्तुत घटना अशी की दिनांक 15/10/2024 रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक श्री ठेंगे साहेब यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, राहुरी शहरात अवैधरित्या वाहनावर दारूची चोरटी वाहतूक होत आहे अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री ठेंगे साहेब यांनी तात्काळ पथक तयार करून राहुरी शहरांमध्ये पाठवून वाहनावर अवैधरित्या दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन खात्री करून कारवाई करणे बाबत सूचना दिल्याने पथकाने बातमीच्या ठिकाणी सापळा लावून राहुरी शहरांमध्ये एक प्लेटिना गाडी क्र. एम एच 17 सी सी 1328 या वाहनावर इसम नामे 1) अक्षय गणेश बिबवे वय 29 वर्ष 2) विजय अशोक जंगले वय 38 वर्ष दोन्ही राहणार पानेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर हा दारूची चोरटी वाहतूक करताना मिळून आल्याने त्यांच्यावर राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांच्याकडून एकूण 6,690, ₹ किमतीची विदेशी दारू व 40,000₹ किमतीची प्लेटिना गाडी एकूण मुद्देमाल 46,690 रु मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहिल्यानगर, श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, सतीश कुराडे, नदीम शेख, अंकुश भोसले नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहिल्यानगर यांनी केलेली आहे.
Leave a reply