राहूरी प्रतिनिधी / आर. आर. जाधव : महाराष्ट्र शासन मार्फत राबविण्यात येणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत महसुल विभागाच्या बारागांव नांदुर महसुल मंडळात तहसीलदार नामदेवराव पाटील साहेब यांच्या मार्ग दर्शना खाली दि १८/६/२०२५ या अभियानांतर्गत शिबिर घेण्यात आले या अभियानात राहुरी तहसील कार्यालयातून विद्यार्थी नागरीकांना मिळणाऱ्या विविध प्रकारच्या दाखल्याचे वितरण बारागाव नांदुरचे सरपंच प्रभाकर गाडे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
या मध्ये भटक्या व विमुक्त जातींचे दाखले , नॉन क्रिमीलेअर , उत्पन्न दाखले अदिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र जातीचे दाखले विविध प्रकारचे एकुन ४५ दाखल्यांचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमात वा बारारागांव नांदुरच्या मंडळाधिकारी श्रीमती सुनंदा मरकड मॅडम बारागांव नांदुरचे ग्राममहसुल अधिकारी अरुण हिवाळे, श्री उमेश पवार मल्हारवाडी , चिंचाळे निरज पुजारी , विकास शिंदे डिग्रस वरवंडी , श्रीमती कांचन घाडगे मॅडम कणगर , बारागाव नांदुर चे ग्रामसेव श्री जाधव साहेब, ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थीत होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बां नांदुर मंडळातील मंडळाधीकारी तसेच सर्व ग्राम महसुल अधिकारी सेतु चालक इत्यादिनी प्रयत्न केले
बारागांव नांदुर येथे महसुल विभागाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान संपन्न

0Share
Leave a reply