अहमदनगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : पारनेर तालुक्यातील टाकळीढोकश्वर येथे आज जागतिक अपंग दिनानिमित्त पंचायत समिती पारनेर (समावेशीत शिक्षण) जि. प.प्राथमिक शाळा -टाकळी ढोकेश्वर व श्री.ढोकेश्वर विद्यालय टाकळी ढोकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी टाकळी ढोकेश्ववर गावामध्ये प्रभातफेरी काढण्यात आली दिव्यांग सप्ताह माहिती दिव्यांग विदयार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची माहिती देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांना श्री.धुमाळ Y. P.सर (रिसोर्स टीचर मध्यवर्ती केंद्र टाकळी ढोकेश्वर)यांच्या कडून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच श्री.राजू महाजन सर यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.व श्री.प्रवीण झावरे सर यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना समावेशीत शिक्षण व दिव्यांग सप्ताह याबाबत माहिती दिली.यावेळी ढोकेश्वर विद्यालय व जि. प.प्रा.शाळा-टाकळी ढोकेश्वर मुख्याध्यापक श्री जावळे सर,प्रवीण झावरे सर, श्री.निवडुंगे सर, श्री.घोरपडे सर, श्री.सैद सर, श्रीम.शेळके मॅडम, श्रीम.डवने मॅडम, श्रीम.वाळुंज मॅडम, श्रीम.खिलारी मॅडम,श्रीम.ठाणगे मॅडम, श्रीम.भनगडे मॅडम, श्रीम.तांबे मॅडम ,श्रीमती गाडेकर मॅडम, श्रीम.घोलप मॅडम, श्रीम.तांबोळी मॅडम व इतर मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी माननिय गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब बुगे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री गेनूभाऊ नरसाळे, केंद्रप्रमुख श्री ठाणगे साहेब,समावेशीत विशेष तज्ञ श्री संकेत देशमुख व श्री.दत्तात्रय आंबेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
HomeUncategorizedजिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी ढोकेश्वर व श्री.ढोकेश्वर विद्यालयय यांच्यावतीने जागतिक अपंग दिन साजरा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी ढोकेश्वर व श्री.ढोकेश्वर विद्यालयय यांच्यावतीने जागतिक अपंग दिन साजरा

0Share
Leave a reply