राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवार, दिनांक १६ जून रोजी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात नवोदित विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत पारंपरिक पद्धतीने करण्यात आले.शाळेत नव्याने दाखल झालेल्या पहिलीतील विद्यार्थ्यांचे पायाचे ठसे घेण्यात आले आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी खास सजवलेल्या थार गाडीतून काढण्यात आली, ज्यामुळे मुलांना खूप आनंद आणि नवीन अनुभव मिळाला. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना गोड जेवणाची मेजवानी देण्यात आली.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट व मोजे यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रचंड उत्साह दिसून आला. या कार्यक्रमाला गावातील पालकवर्ग, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील श्रीमती साळवे मॅडम, मोरे मॅडम, कांबळे मॅडम, दुधाडे मॅडम व सर्व शिक्षकवर्ग यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती साळवे मॅडम यांनी केले, तर मोरे मॅडम यांनी समस्त ग्रामस्थांचे आभार मानले.
गोटुंबे आखाडा येथील जिल्हा परिषद शाळेत नवोदित विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

0Share
Leave a reply