राहुरी प्रतिनिधी / आर.आर.जाधव : सडे गावातील अनेक तरूणांनी स्वःता हुन पुढाकार घेत कर्डीले साहेबाना जाहीर पाठींबा देत भाजपा मध्ये प्रवेश केला आहे . यावेळी सडे गावातील तरुणांनी इकडून तिकडे पक्षप्रवेश करून स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या सडे गावातील पुढाऱ्याच्या व्यथा मांडून नाराजी व्यक्त केली .या प्रवेशा दरम्यान या तरूणांवर कर्डीलेंना पाठींबा देऊ नये या साठी दबाव टाकण्यात आला असल्याचे कर्डीले यांना समजताच कोणाच्याही धमकीला बळी पडू नये . मि सदैव तुमच्या पाठीशी राहील तुम्ही त्याची काळजी करू नये .निर्भय पणे काम करा तुम्हाला कसलीही अडचण येऊ देणार नाही असे ठोस अश्वासन कर्डीले साहेबांनी या वेळी दिले . सडे गावातील काही इच्छुक तरुण भितीपोटी आले नसल्याचेही उपस्थित तरुणांनी कर्डिले यांना सांगितले त्यावेळी आ. कर्डिले म्हणाले की ही लोकशाही आहे त्यामुळे कोणीही हुकुमशाहीचा वापर करू नये व मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नये . सद्ध्या सोशल मिडियावर फेक नेरेटिव्ह पसरवण्याचे काम जोरात सुरू आहे परंतू जनता आता याला भुलणार नसल्याचेही यावेळी आ. कर्डिले यांनी बोलतांना सांगितले .
सडे गावातील तरुणांनी आ . कर्डिले यांना सडे गावातून लिड तर देऊच पण तालुक्यातील सर्व जनतेने सुद्धा सर्व दृष्टीने विचार करून आ. कर्डिले यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे .
Leave a reply