संगमनेर प्रतिनिधी / धनेश बाळासाहेब कबाडे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात येऊ लागला असून महविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारा साठी रविवारी तळेगाव दिघे येथे माजी मंत्री अमित देशमुख खासदार डॉक्टर अमोल कोल्हे ,खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि खासदार निलेश लंके येणार असल्याचे युवक काँग्रेस अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांनी माहिती दिली.
संगमनेर मतदार संघातून नवव्यांदा निवडणूक लढविणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ रविवारी संध्याकाळी 5 वाजता तळेगाव दिघे येथे युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आहे . या साठी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे या ठिकाणी दोन्ही नेते विरोधकांवर काय भाष्य करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे .आमदार बाळासाहेब थोरात हे तालुक्याच्या जनतेच्या पाठबळावर नव्यांदा निवडणूक लढवत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे . थोरतानी निळवंडे धरण पूर्ण करून व कालवे पूर्ण करून ग्रामीण दुष्काळी भागात समृध्दी आणली आहे . सामान्य जनते च्या हृदयात ते जलनायक म्हणून वास करत आहे . तसेच तहसील कार्यालय , प्रंतकर्यालय ,पोलीस स्टेशन , बस स्टँड , तसेच सहकार , शेती आणि शिक्षण शेत्रात आधुनिक क्रांती त्यांनी आणली आहे . जिल्हा पेक्ष्या मोठा विकास संगमनेर तालुक्यात पहावयास मिळतो . येथे विरोधकांचे पण कॉलेज , दूध संघ आणि उद्योग धंदे पहावयास मिळतात त्यामुळेच विधानसभेत संपूर्ण महाराष्ट्राची जबादारी त्यांच्यावर देण्यात आली आहे ह्या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान माहविकास आघाडीच्या वतीने करण्यात आहे आहे .
माजी मंत्री अमित देशमुख , खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत रविवारी तळेगाव दिघे येथे युवक मेळावा

0Share
Leave a reply