Disha Shakti

इतर

भिगवण मध्ये आढळला प्रथमच दुर्मिळ जातीचा पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या साप

Spread the love

इंदापूर तालुका प्रतिनिधी /  प्रवीण वाघमोडे : इंदापूर तालुक्यातील भिगवण या ठिकाणी जैवविविधतेला अधोरेखित करणारी वेगवेगळी उदाहरणे पाहायला मिळत आहेत. अशातच पुन्हा भिगवण या ठिकाणी एक दुर्मिळ साप सापडल्याची माहिती भिगवण येथील भिगवण वाईल्डलाईफ रेस्क्यू टीम ने दिली आहे. सध्या ऊन-वारा,थंडी तसेच ढगाळ हवामान असे नैसर्गिक वातावरण तयार होत असून कधी थंडी, कधी ऊन तर कधी ढगाळ हवामान असे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. अशातच नैसर्गिक जीवसृष्टीमध्ये सुध्दा बदल होताना दिसत आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी साप दिसून येण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.

अशातच भिगवण वाईल्डलाईफ रेस्क्यू टीम च्या हेल्पलाईन नंबर वर एक मण्यार जातीचा साप घराच्या आवारात दिसल्याची माहिती फोनद्वारे संस्थेस मिळाली..लगेचच भिगवण वाईल्डलाईफ रेस्क्यू टीमचे सदस्य सर्पमित्र दत्ता कुंभार यांना ही माहिती देण्यात आली.. त्यांनी कोणताही वेळ न लावता घटनास्थळी धाव घेऊन सदर साप कोणता आहे याची माहिती घेतली असता त्यांना जैवविविधतेमध्ये अत्यंत कमी नोंद असलेला व दुर्मिळ होत चाललेला बिनविषारी जातीतील पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या जातीचा साप दिसून आला. सदर साप सर्पमित्र दत्ता कुंभार यांनी पूर्णपणे व्यवस्थित व त्या सापास कोणतीही इजा न होता पकडून त्याची माहिती संस्थेस दिली. संस्थेचे वन्यजीव अभ्यासक श्री. गौतम शेलार यांनी या घटनेस दुजोरा दिला असून त्यांच्याकडून आम्ही या दुर्मिळ सापाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

श्री. गौतम शेलार यांनी सांगितले की हा Yellow Spotted Wolf Snake असून याला मराठीमध्ये पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या साप असे म्हणतात. हा साप पूर्णपणे बिनविषारी असून या सापामुळे मानवास कोणतीही हानी पोहोचत नाही.हा साप बऱ्यापैकी विषारी मण्यार या सापासारखा दिसत असल्यामुळे याला भितीपोटी मारले जाते असे त्यांनी सांगितले.
हा साप कसा असतो. हा साप दिसायला नाजूक असा साप असतो. त्याचा कलर हा वरून काळा व पोटाखालचा भाग पूर्णपणे पांढरा असतो. आणि त्याच्या काळ्या शरीरावर पिवळ्या कलरचे ठिपके दिसून येतात त्यामुळेच या सापाला पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या साप असे नाव पडले आहे.

भिगवण वाईल्डलाईफ रेस्क्यू टीम या संस्थेकडून अनेक दुर्मिळ सापांना जीवदान

या आधी ही या संस्थेकडून अनेक दुर्मिळ सापांना जीवदान देण्याचे काम केले आहे त्यात स्मूद स्नेक म्हणजे गजरा साप, अल्बिनो वूल्फ स्नेक, रसेल कुकरी,अल्बिनो कोब्रा, या सापांचा त्यात समावेश आहे.
सदर साप भिगवण परिसरात दिसून आल्याने भिगवणच्या जैवविविधतेमध्ये आणखीनच भर पडली असून भविष्यात असेच काम करण्याची प्रेरणा आम्हाला मिळत आहे असेही श्री. गौतम शेलार यांनी सांगितले. सदर सापाची माहिती वनविभागास देऊन सदर साप निसर्गाच्या सानिध्यात सोडून देणार आहे. तसेच भिगवण व भिगवण परिसरात कोणताही वन्य पशु-पक्षी जखमी अवस्थेत किंवा कोणताही साप आपल्या घराच्या परिसरात दिसून आल्यास त्यास कोणताही धोका न पोहोचवता त्वरित त्याची माहिती
भिगवण वाईल्डलाईफ रेस्क्यू टीम किंवा वनविभागाला देण्याचे आवाहन श्री. गौतम शेलार यांनी केले आहे.
भिगवण वाईल्डलाईफ रेस्क्यू टीम
हेल्पलाईन नंबर.
9960987743
9699533817


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!