Disha Shakti

कृषी विषयी

राहुरी कृषी विद्यापीठाच्यावतीने नाळीद येथे एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण संपन्न

Spread the love

राहुरी विद्यापिठ / आर.आर.जाधव : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कृषी वनस्पतीशास्त्र विभागाअंतर्गत क्षमता असलेल्या पिकांवरील आ.भा.सं.सं.प्रकल्प, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने व राहुरी कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.सत्तापा खरबडे व संशोधन संचालक डॉ.विठ्ठल शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील नाळीद येथे ४ फेब्रुवारी २०२५ रोजी एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाले.

या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमानिमित्त विद्यापीठाच्या कृषी वनस्पतीशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून राजगिरा, चारधारी वाल, करटोली, किनोवा, व सिमारूबा या पिकांच्या लागवडी संबधी मार्गदर्शन केले तसेच या पिकांचे मानवी जीवनात क्षमता असलेल्या पिकाचे उपयोग व आहारातील महत्व तसेच या पिकांच्या दुर्मिळ वाणांचे जतन करणे याबद्दलची माहिती डॉ.विजू अमोलिक, डॉ.मुकुंद भिंगारदे, डॉ. आर.एस बागुल यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री.नंदन अमृता गावित माजी सरपंच तसेच कृषी वनस्पतीशास्र विभागाचे प्रमुख डॉ.विजू अमोलिक, क्षमता असलेल्या पिकांवरील आ.भा.सं.सं. प्रकल्पाचे रोप पैदासकार डॉ.मुकुंद भिंगरदे , प्रकल्पाचे कृषी सहाय्यक बापू अडसुरे व नाळीद गावातील , श्री.काभू तुकाराम बागुल उप सरपंच , श्री. रामभाऊ मांगू जगताप , श्री, लक्ष्मण बाजीराव वाघ, श्री. देवराम वामन गावित सामाजिक कार्यकर्ते , श्री.धनराज आनंदा पवार पोलीस पाटील, नंदू भाऊराव गांगुर्डे गणोरे येथील सामाजिक कार्यकर्ते व नाळीद ग्रामपंचायत सदस्य यासह गावातील महिला व पुरुष शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना क्षमता असलेल्या पिकांवील आ.भा.सं.सं. प्रकल्पाच्यावतीने भोजन, राजगिरा फुले कार्तिकी व फुले चारधारीवाल बियाणे व ट्रेनिंग किटचे वाटप करण्यात आले. सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी या प्रकल्पाचे कृषी सहाय्यक श्री. बापू अडसुरे व अतुल डाडर, रावजी पठारे यांचे सहकार्य लाभले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!