प्रतिनिधी / प्रमोद डफळ : संसदेमध्ये भाषण करताना खासदार राजेंद्र गावित यांनी धनगर समाजाविषयी धनगर समाज लँड माफीया आहे त्यांना आरक्षणाची गरज नाही असे मत व्यक्त केले वास्तविक परिस्थिती पाहता धनगर समाज जंगलामध्ये भटकंती करतो अतिशय हलाखीचे जीवन जगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आरक्षण दिलेले असताना फक्त र आणि ड या शब्दाच्या घोळामुळे गेली 70 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे परंतु धनगर समाजाने आत्तापर्यंत आपल्या या मागणीसाठी सर्व आंदोलने न्यायिक पद्धतीने केली कधीही कुणावर शिंतोडे ओढण्याचा प्रयत्न केला नाही.
शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व राजकीय भागीदारी अतिशय अल्प प्रमाणात असताना या समाजाचे हलकी चे जीवन सुरूच आहे तरीही खासदारांची अशी भाषा सुरू झाल्याने समाजामध्ये उद्रेक निर्माण झाला आहे याचा शासनाने गंभीर विचार करावा व राजेंद्र गावित यांनी धनगर समाजाची माफी मागावी अशा मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील साहेब यांना देण्यात आले या निवेदनावर जिल्हाप्रमुख विजय तमनर, दक्षिण जिल्हाप्रमुख अशोक वीरकर, शहराध्यक्ष कांतीलाल जाडकर, धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र तागड, धनगर वाडीचे सरपंच किशोर शिकारे, राहुरी तालुका प्रमुख सुभाष गुलदगड, नगर तालुका प्रमुख रमेश भोजने, संपर्कप्रमुख मंगेश दातीर, पारनेर तालुकाप्रमुख जालिंदर भांड, पिंपरी अवघडचे उपसरपंच दत्ताभाऊ बाचकर, प्रवीण सरोदे, बाळासाहेब आढाव, प्रशांत भोजने, मुळा धरणग्रस्त संघटनेचे नेते ठका भाऊ बाचकर सह आदी समाज बांधव उपस्थित होते. यावेळी यशवंत सेनेच्यावतीने खासदार राजेंद्र गावित यांचा निषेध करण्यात आला.