: वैद्यकीय शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरचे असले तरी जिद्द, चिकाटी, अथक परिश्रम, प्रबळ इच्छाशक्ती च्या जोरावर शक्य असून ग्रामीण भागातील विद्यार्थीही स्पर्धेच्या युगात अग्रेसर असून सुयोग्य संस्काराने अशक्य ते शक्य असल्याची भावना श्री श्री गुरुकुलचे मुख्याध्यापक लक्ष्मण नरे यांनी व्यक्त केले. अणदूर तालुका तुळजापूर येथील जवाहर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एम. बी. बिराजदार यांची सुकन्या भाग्यश्री हिने दंत विद्या पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल जय मल्हार पत्रकार संघ व व्हॉइस ऑफ मीडिया यांच्या वतीने ये थोचित्त सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
सध्याचे युग हे स्पर्धेचे असून विद्यार्थ्यांनी विशेषता पालकांनी या स्पर्धेत पाल्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. निव्वळ नशिबावर लक्ष केंद्रित न करता परिस्थितीला चार हात करून यश संपादन करण्याची आवश्यकता असल्याचे नरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना डॉ. भाग्यश्री बिराजदार म्हणाल्या की, धनसंपत्तीपेक्षा आरोग्य संपत्ती महत्त्वाची असून लहानपणापासूनच दाताच्या आरोग्याचे काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्याच्या दृष्टीने दाताला अनन्यसाधारण महत्त्व असून निव्वळ दुर्लक्ष केल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे खंत व्यक्त करून, शरीराच्या सर्व अवयवाबरोबरच दाताची काळजी घेतल्यास मानसिक, शारीरिक व सौंदर्यात खऱ्या अर्थाने भर पडेल असा विश्वास ही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यावेळी दयानंद काळुंके, शिवशंकर तिरगुळे, डॉ. एम .बी. बिराजदार यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
Leave a reply