प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास साडेतीनशे वर्ष पूर्ण होत असल्याने ‘शिवराय मनामनात शिवराय घराघरात’ हि संकल्पना घेऊन आमदार निलेश लंके यांच्या वतीने ‘शिवस्वराज्य यात्रा’ गावोगाव पोहचवली जात आहे. मोहोज देवढे येथे शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने रणजीत कादणकर यांचे व्याख्यान झाले. छत्रपती शिवरायांचे अर्थशास्त्रीय विचार, शिवरायांचे पारदर्शी प्रशासन, शेतकऱ्यां विषयीचे शिवरायांचे धोरण आणि तरुणांना सदैव प्रेरणा देणारे शिवाजी राजे यांच्या विषयी काणनकर यांनी आपल्या व्याख्यानातून लोकांना शिवचरित्र उलगाडून सांगितले.
“रयतेचे राज्य उभे करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी इतर शाह्यांप्रमाणे भोसले शाही उभी न करता त्यांनी स्वराज्य उभे केले.त्यांनी शेतकऱ्यां विषयी उपयुक्त धोरणे राबवली, कारभार चालवतांना बारीक-सारीक गोष्टींचा विचार केला आणि इतर शाह्यांच्या होत असलेल्या जुलमांचा प्रतिकार करून कणखर असे स्वराज्य उभे केले” अशा शब्दांत रणजीत काणनकर यांनी शिवचरित्र लोकांसमोर मांडले. यावेळी वैष्णवी चव्हाण, कोमल भांड, गुरुदत्त माळी, महेश वैद्य, महेश चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. शिवचरित्र शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आलेल्या मान्यवरांचा मोहोज देवढे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार राजेंद्र देवढे, रावसाहेब देवढे, भारत देवढे, कैलास देवढे, संदीप देवढे, भगवान बेळगे, मिनिनाथ हाडके, इन्नुस शेख,प्रकाश काटे, गोरख देवढे, भाऊसाहेब देवढे, शिवाजी वेताळ, मनीष उबाळे, विठ्ठल देवढे यांच्यासहित मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
व्याख्यानानंतर गावातील वेशीतील चित्रकार मनीष उबाळे यांनी काढलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांना मान्यवरांनी भेट दिली. आभार प्रदर्शन करत असतांना आदिनाथ देवढे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे करतांना स्वतःच्या नावाचा वापर टाळून कोणतीही शाही उभी न करता रयतेचे स्वराज्य उभे केले मात्र राज्यकर्ते भारत सरकारचे नाव बदलून नेत्यांच्या नावाने सरकारी प्रचार यंत्रणा गावोगाव राबवत आहेत अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
Leave a reply