पारनेर विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : तालुक्यातील आदर्श गाव टाकळीढोकेश्वर पंचक्रोशीतील सर्वधर्मियांचे श्रध्दास्थान असलेले जागृत देवस्थान ग्रामदैवत माता बनाई देवी यात्रात्सवाला गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवार दि. ३१ मार्च पासून भक्तीमय वातावरणात सुरुवात होणार आहे. हा चार दिवसीय यात्राउत्सव ३ एप्रिल पर्यंत होणाऱ्या या यात्रोत्सवा निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष माजी सरपंच शिवाजी खिलारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अंकुश पायमोडे, बाळकृष्ण पायमोडे,यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष रामभाऊ तराळ यांनी दिली.
सोमवार दि.३१ मार्च २०२५ रोजी फकीर शहावाली बाबांचा संदल कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात दारुगोळ्याची आतषबाजी कण्यात येणार आहे. तसेच परंपरेनुसार मंगळवार दि.१ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता बनाईदेवी काठी मिरवणूक रात्री ७.३० वाजता भव्य छबिना मिरवणूक व जागरण गोंधळ रात्री १० वाजता निलेश कुमार आहिरेकर सह रुपाली पुणेकर लोकनाट्य तमाशा, बुधवार दि.२ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता मळगंगा देवीची काठी मिरवणूक, दुपारी चार वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविण्यात येणार आहे. रात्री ७.३० वाजता भव्य छबिना मिरवणूक रात्री १० वाजता मळगंगा मंदिरासमोर जागरण गोंधळ,गुरुवार दि. ३ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता मुक्ताई देवीची काठी मिरवणूक, यात्रेनिमित्त सकाळी ९ ते ६ वाजेपर्यंत भव्य बैलगाडा शर्यतींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रात्री ८.३० वाजता छबिना मिरवणूक, रात्री १० वाजता देवीसमोर जागरण गोंधळ यात्रोत्सवात दररोज भव्य मिरवणुकीसाठी मुख्य पारंपारिक पद्धतीने ढोल ताशा सनई पथक खास आकर्षण असणार आहे. यात्रोत्सव असल्या कारणाने गावातील मुख्य प्रवेशद्वार तसेच संपूर्ण मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रेमध्ये विविध प्रकारची दुकाने थाटणार असल्याने विविध वस्तू खरेदीचा कार्यक्रम तीन दिवस चालतो. टाकळी ढोकेश्वर परिसरातील हा सर्वात मोठा यात्रा उत्सव असतो.
यात्रा उत्सवाचा आनंद संयमाने घ्या : शिवाजी खिलारी
टाकळी ढोकेश्वर मध्ये भरणारा फकिर शाहवली बाबांचा संदल आणि बनाईदेवी यात्रा उत्सव हा महाराष्ट्रातील हिंदू मुस्लिम ऐक्याचा अनोखा आविष्कार दाखविणारा यात्रा उत्सव असून अठरा पगाड जातीचे लोक यामध्ये सहभागी होऊन आनंद घेत असतात. मात्र या यात्रा उत्सवाचा आनंद संयमाने घ्या या यात्रा काळात जर कोणीही गैर कृत्य केले तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. आपले कुलधर्म कुलाचार आपण आनंदाने करावा मात्र त्याला गालबोट लागू नये असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष माजी सरपंच शिवाजी खिलारी, यात्रा कमिटीचे मार्गदर्शक निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी, सचिव पत्रकार वसंत रांधवण, बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण पायमोडे, धोंडीभाऊ झावरे, संजय झावरे, ग्रा. पं. सदस्य बापूसाहेब रांधवण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अंकुश पायमोडे, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष मळिभाऊ रांधवण, गंगाधर बांडे,शरद झावरे,शिराज हवलदार, बाळासाहेब बांडे, संदिप नाईकवाडी, विकास सोनुळे, सुरेश झावरे, गोरक्षनाथ गोरडे, ज्ञानदेव पायमोडे, ग्रा.प. सदस्य भाऊसाहेब खिलारी,प्रकाश ईघे, श्री ढोकेश्वर सैनिक फाउंडेशनचे सचिव संजय खिलारी, ज्ञानदेव पायमोडे, गणेश जेजूरकर,विवेक धुमाळ यांनी केले आहे.
टाकळीढोकेश्वर येथील बनाईदेवी यात्रा उत्सवास सोमवार पासून सुरुवात, यात्रा उत्सवाचा आनंद संयमाने घ्या – शिवाजी खिलारी

0Share
Leave a reply