अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : अणदूर येथील शिव मल्हार बचत गटाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तथा युवा उद्योजक लक्ष्मण चौगुले व गरुड फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचा चंद्रकांत हगलगुंडे यांना यंदाचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार म्हणून निवड झाल्याबद्दल नळदुर्ग येथील सुदर्शन फंक्शन हॉल येथे प्रा. सूर्यकांत आगलावे व सेवानिवृत्त मुख्याध्यापक यशवंत मोकाशे गुरुजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..
यावेळी बोलताना अण्णाराव करपे म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासून 20 सभासद असलेल्या शिव मल्हार बचत गटाच्या माध्यमातून एकमेका सहकार्याच्या भावनेतून सहकार्य करून अडचणी व समस्या वर मार्ग काढण्याचा प्रयत्न असून निव्वळ बचत .. नफा याला बाजूला सारून एकोपा व मदतीच्या भावनेने या गटाची वाटचाल चालू असल्याचे सांगून गुणी जणांचा सत्कार हा गटाचा उद्देश असल्याने सांगितले. सत्काराला उत्तर देताना चौगुले म्हणाले की, कष्ट, मेहनत कामाशी एकनिष्ठ राहिल्यास अंतिम ध्येय शक्य असून जीवनात निव्वळ पैशा व प्रतिष्ठेला महत्त्व न देता सामाजिक कार्यास व विकासापासून दूर असलेल्याना हात आणि साथ दिल्यास जीवण खऱ्या अर्थाने सार्थक होईल अशी भावना व्यक्त केली.
यावेळी सर्वश्री कमलाकर घुगे, माणिक निर्मळे, अनिल करपे, मोहन सुरवसे, जनार्दन कांबळे, दिगंबर मुळगडे, मधुकर मोरे, रामचंद्र साखरे, रघुनाथ जाधव, अमित चौधरी, महादेव करपे, सुरेश चव्हाण, तानाजी पोतदार, नागेश कुंभार उपस्थित होते. शेवटी कमलाकर घुगे यांनी आभार व्यक्त केले.
Leave a reply