Disha Shakti

राजकीय

समाजवादी पार्टीचे देवानंद भाऊ रोचकरी यांची आज अंदुरला सभा

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर विधानसभा मतदारसंघ महा विकास आघाडी मित्रपक्ष आणि समाजवादी पार्टीचे अधिकृत उमेदवार देवानंद साहेबराव रोचकरी उद्या दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता अणदूर येथे जाहीर सभेचे आयोजन केले आहे. तालुक्यातील देवराज मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देवराज मित्र मंडळाचे अध्यक्ष शिवाजी कांबळे केले आहे.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढत होत असून प्रचाराच्या अंतिम टप्प्यात रोचकरी यानी जोरदार मुसंडी घेतल्याचे चित्र दिसत असून गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांचे नाव सर्वसामान्य जनतेशी जोडली गेल्याने, तसेच सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे या निवडणुकीत चमत्कार घडेल का असा सूर ऐकावयास मिळत आहे. देवानंद भाऊंच्या उमेदवारीमुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असे चित्र पाहावयास मिळणार आहे त्यामुळे या सभेकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे हे मात्र निश्चित..


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!