सोनई प्रतिनिधी/ मोहन शेगर : शनीशिंगणापूरचे पोलीस पाटील यांना राज्यपालाच्या वतीने दिला जाणारा उल्लेखनीय सेवेबद्दल उल्लेखनीय सेवा पुरस्कार अॅड सयाराम पाटील बानकर यांना 1मे महाराष्ट्र दिनी राज्यपालाच्यावतीने जिल्ह्याचे पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात प्रदान करण्यात आला. यावेळी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, आदी मान्यवर उपस्थित होते राज्यातील पोलीस पाटलांचा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो नामदार विखे यांच्या हस्ते अँड सयाराम बानकर यांना प्रशस्तीपत्रक स्मृतीचिन्ह, व रोख 25 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पुरस्कार वितरण प्रसंगी गणेशवाडीचे सरपंच कैलास दरंदले , पोलीस पाटील संघटनेचे नेवासा तालुका अध्यक्ष रमेश डोळे, संजय दहिफळे, आसाराम कोरळडे, प्रसाद दहिफळे, सुरेश बांनकर, भाऊसाहेब बांनकर , कचरू जंगले, बाळासाहेब बानकर, रामभाऊ जगताप, बापूसाहेब निबे आदी मान्यवर उपस्थित होते अडवोकेट सयाराम पाटील बानकर यांना पोलीस पाटील यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल शासनाच्या वतीने सर्वोच्च पुरस्कार देऊन महाराष्ट्र दिनाच्या दिवशी शासनाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अँड बानकर यांचा विविध संस्थेच्या वतीने अभिनंदन केले जात आहे
शनी शिंगणापूचे पोलीस पाटील सयाराम बानकर यांना पोलीस पाटील उल्लेखनीय सेवा पुरस्कार प्रदान

0Share
Leave a reply