दिशाशक्ती राहूरी : राहुरी तालुक्यातील ब्राह्मणगाव भांड या ठिकाणी माजी सैनिक बाळू यादव शेलार यांची वस्ती आहे. या वस्तीवर गेल्या पंचवीस वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तसेच रस्ता, लाईट, घरकुल,शौचालय या सर्व शासकीय योजनांपासून ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी जाणीवपूर्वक वंचित ठेवल्याचा आरोप करत शेलार कुटुंबीय मंगळवार दिनांक 13 मे 2025 रोजी सकाळी अकरा वाजता राहुरी पंचायत समिती समोर आमरण उपोषणास बसले होते. यावेळी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी शेलार कुटुंबीयांची उपोषण स्थळी भेट घेत त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आठ दिवसात मार्गी लावण्यात येईल व ईतर मुलभूत सुविधा लवकरच दिल्या जातील असे आश्वासन दिल्याने शेलार कुटुंबियांनी तात्पुरते उपोषण स्थगित केले आहे.
या वेळी शेलार कुटुंबियांनी आरोप केला की ब्राह्मणगाव भांड येथील ग्रामसेवक व सरपंच यांनी जाणीवपूर्वक शेलार वस्ती ही मागासवर्गीयांची असल्याकारणाने येथे कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा पोहोचू दिल्या नाहीत असा आरोप शेलार कुटुंबीयांनी करत राहुरी पंचायत समिती समोर उपोषण सुरु केले होते .याच वस्तीवर राहणारे माजी सैनिक बाळू यादव शेलार यांनी सैन्यामध्ये 1980 ते 1997 पर्यंत देश सेवा केलेली आहे .त्यांनी शांती सेने मध्ये सहभाग घेतला होता त्यात त्यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले होते, अशा माजी सैनिकाला आज निवृत्तीनंतर त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांना मूलभूत सुविधा देखील मिळत नसल्याची खंत यावेळी शेलार कुटुंबियांनी व्यक्त केली. या उपोषणामध्ये ब्राह्मणगाव भांड येथील माजी सैनिक बाळू
यादव शेलार,भास्कर शेलार, राजेंद्र शेलार, गोपीनाथ शेलार, संजय शेलार, अशोक शेलार, रवी शेलार, विठाबाई शेलार, बेबी शेलार, संगीता शेलार, कौसाबाई शेलार, हौसाबाई शेलार आदींनी सहभाग घेतला होता.शेलार कुटुंब यांच्या मागण्यासाठी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव चांदणे यांच्यासह सकल मातंग समाजाचे समन्वयक निलेश जगधने, नंदू भाऊ शिंदे, ज्ञानेश्वर जगधने, ना.म.साठे सर,कांतीलाल जगधने, वसंत जगधने, सामाजिक कार्यकर्ते जेम्स ससाने, दिलीपराव सोळसे, यांनी पाठिंबा दिला.
माजी सैनिकाची वस्ती पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी शेलार कुटुंबियाचे उपोषण, गटविकास अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

0Share
Leave a reply