राहूरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या म्हैसगांव येथील प्रसाद फौंडेशन संचलित डॉ. सुभाष काकडे ज्युनिअर कॉलेज च्या इयत्ता 12 वी च्या विदयार्थी आणि विदयार्थीनीने 100% निकाल लावत डॉ. सुभाष काकडे ज्युनिअर कॉलेज चे नाव जिल्ह्यात गाजवले आहे. दरवर्षी प्रमाणे सलग आठव्या वर्षी पालक आणि विदयार्थी यांचा विश्वास सार्थकी ठरवत या वर्षीही विदर्थांनी घणघणीत यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा या कनिष्ठ महाविद्यालया मुळे करता येत आहे.
CET/ JEET/ NEET. इ परीक्षा मध्ये येणारा निकाल अतिशय चांगला आणि कनिष्ठ महाविद्यालय याचे नावलौकिक करणारा असेल हे नक्की. येथील गुणवंत विदयार्थ्यांचे अभिनंदन व गुण गौरव होत आहे. कला शाखेतील कु. शेख शबनम युनूस हिने 84.17% मिळवत प्रथम क्रमांक मिळविला आहे.
शबनम शेख हि आदर्श पत्रकार युनूस शेख यांची आणि शेरी अंगणवाडी क्र. 60 च्या मदतनीस सौ. बिस्मिल्ला शेख यांच्या कन्या असून दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात शबनमने यापूर्वी हि अनेक आदर्श पुरस्कार प्राप्त केले आहे. यावर्षीही तीने 12 वी मध्ये बेस्ट स्टुडन्ट अवॉर्ड घेतलेला आहे.शबनमच्या या यशाने शाळेतील शिक्षकांनी भ्रमन ध्वनीद्वारे शुभेच्छा देत गुण गौरव केला आहे. शबनम च्या भरीव यशाने नातेवाईक, मित्र परिवार, आदी कडून स्वागत आणि अभिनंदन होत आहे.
Leave a reply