अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता सर्वेक्षण मोहीमे अंतर्गत श्री. युवराज कराड व त्यांचे सहकारी श्री. गोदाम यांनी अणदूर येथील बस स्थानकातील स्वच्छतेची पाहणी करून समाधान व्यक्त केले.अणदूर हे राष्ट्रीय महामार्गावरील गर्दीचे ठिकाण असून दैनंदिन शेकडो प्रवाशांची ये जा, राष्ट्रीय बँक, प्रसिद्ध खंडोबा मंदिर, नावाजलेले शैक्षणिक संस्था व मोठी बाजारपेठ असल्यामुळे प्रवाशांचे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. बहुतांश गाड्या या परस्पर बाहेरून जात असल्याने प्रवाशांना नाक दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत असल्याची खंत यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अड. दीपक दादा आलूरे यांनी व्यक्त करून संबंधितांना जाणीव करून दिली.
प्रारंभी अड. दीपक दादा आलूरे यांनी बीडचे विभागीय वाहतूक अधीक्षक सन्माननीय युवराज कराड व त्यांचे सहकारी गोदाम साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन सुनील सूर्यवंशी, वाहतूक नियंत्रक राजकुमार चव्हाण ,आयुब अत्तार, अजित वचने, खंडू व्हणाळे, बारगळ गुरुजी, सिद्धार्थ कांबळे, स्वच्छता दूत भीमा उर्फअजीबाळ गायकवाड सहा प्रवासी उपस्थित होते.
Leave a reply