नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : नायगांव शहरातील स्वामी रामानंद तीर्थ चौक येथे दिनांक 7 मे 2025 रोजी आर्य वैश्य समाजाची आराध्य दैवत असलेल्या माता कन्यका परमेश्वरीचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार प्रतिनिधी तथा नगरसेवक पंकज पाटील चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा चे प्रतिनिधी संजय पाटील चव्हाण, युवा उद्योजक व्यंकटेश सावकार लोहगावकर श्रीनिवास सावकार जावदवार, पवन गादेवार श्रीनिवास गडपलेवार, वसंत जवादवार. होते कार्यक्रमाची सुरुवात माता कन्यका परमेश्वरीची पुजा आरती व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यानिमित्त सामाजिक कार्यात उत्कृष्ट सेवा करणाऱ्या 20 लक्ष्मी नारायण जोडप्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते मारोती राजेश्वर कतुरवार तर सुत्रसंचलन आर्य वैश्य महासभेच्या महिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख पवन मनोहर गादेवार. यांनी केले. आभार कपिलेश्वर नलबलवार यांनी मानले. या कार्यक्रमाला विनोद गंजेवार. बालाजी करकेलवार, सचिन सोमावार. संजय मामीडवार. संजय आरगुलवार. एल टी मामीडवार गोरठेकर. सूर्यकांत कोंडावार. प्रकाश नारलावार.रवि रागा. ओम नारलावार. श्रीनिवास प्रतापवार. संजय देवशेटवार. संजय संगणवार. गजानन कोंडावार. सौ जयश्री संजय मामीडवार.सौ. सुनीता नारलावार. सौ. मीना मारोती कतुरवार. शहरातील नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नायगाव शहरामध्ये माता कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव सोहळा हर्षउल्हासाने मोठ्या थाटात साजरा …!

0Share
Leave a reply