Disha Shakti

Uncategorized

निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमी वर राहुरी पोलिसांकडून साडेतीन लाख रुपये कॅश जप्त

Spread the love

राहुरी प्रतिनिधी /ज्ञानेश्वर सुरशे : दिनांक 06/11/2024, रोजी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की एक इसम दुचाकी वर राहुरी येथे रोख रक्कम घेऊन येणार आहे .अशी बातमी मिळाल्याने सदर नमूद बातमीची हकीगत गुन्हे शोध पथकास देऊन तात्काळ नमूद ठिकाणी रवाना केले असता इसम नामे शाकीर सत्तार शेख वय २९ रा.वांबोरी, जि.अहिल्यानगर हा वाहन क्रमांक MH 16 DK 805.च्या डिक्की मध्ये रोख रक्कम साडेतीन लाख रुपये ताब्यात घेऊन मिळून आला . त्याला त्या रोख रकमेबाबत कुठलाही खुलासा देता न आल्याने तपास पथकाने सदर बाब माननीय निवडणूक निर्णय अधिकारी श्री शाहू मोरे साहेब ,राहुरी यांना कळवून निवडणूक अनुषंगाने निर्माण केलेले भरारी पथक प्रमुख शुभम ठिगळे, फोटो ग्राफर रोहन गायकवाड यांना घटनास्थळी बोलावून सदर इसमाच्या ताब्यातील रोख रक्कम साडेतीन लाख रुपये पंचा समक्ष पंचनामा करून जप्त करून पोलीस स्टेशन राहुरी येथे मुद्देमाल कक्षात जमा केली. सदर रोख रकमेबाबत चौकशी सुरू असून माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांना सदर बाबत अहवाल पाठवण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहिल्यानगर, श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरज गायकवाड, अशोक शिंदे विकास साळवे, प्रमोद ढाकणे , अंकुश भोसले, आजिनाथ पाखरे,गोवर्धन कदम, सचिन ताजने , चालक पोहेको शकूर सैय्यद नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहिल्यानगर यांनी केलेली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!