अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील आदर्श सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र दादा आलूरे यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श संस्था चालक पुरस्कार जाहीर झाल्याने दादांचे सर्व थरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
नामदार योगेश कदम गृहराज्यमंत्री यांच्या हस्ते, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 10=00 वाजता सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे राज्यस्तरीय संस्था चालक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे संस्थापक प्रा. डॉ. बापूसाहेब अडसूळ प्रदेशाध्यक्ष एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटनेने पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
मराठवाड्याचे साने गुरुजी म्हणून संबोधले जाणारे स्वर्गीय सी. ना. आलूरे गुरुजी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत 1959 रोजी संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून या संस्थेचे असंख्य विद्यार्थी सात समुद्रा पलीकडे विविध क्षेत्रात कार्य करीत असून आदरणीय गुरुजींच्या पावलावर पाऊल ठेवून निस्वार्थ भावनेने आज त्यांचे पुतणे रामचंद्र दादा काम करताना प्रकाशाने जाणवते.
या संस्थेअंतर्गत 10 माध्यमिक शाळा,2 कनिष्ठ महाविद्यालय, 1 वरिष्ठ महाविद्यालय, 1 शाळा, 4 पूर्व प्राथमिक शाळा, 3 आर्थिक दुर्बल घटक वस्तीग्रह, 2 मागासवर्गीय मुलींचे वस्तीग्रह, 1 माध्यमिक रात्र शाळा कार्यरत असून 2021 पासून आजतागायत सरपंच म्हणून कार्यरत, गतवर्षी राज्य शासनाचा आदर्श ग्रामपंचायत दहा लाखांचे बक्षीस, बालाघाट संस्थेचे संचालक, सोसायटीची मा.चेअरमन, तुळजापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ कला उपासक मंडळ, आदर्श संस्थाचालक जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित अशा विविध पदावर कार्यरत आहेत.
शैक्षणिक, आरोग्य शिक्षण, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, नैसर्गिक आपत्ती ग्रस्तांना सहाय महात्मा गांधी विचारांचा प्रचार आणि प्रसार, साने गुरुजी कथामाला व कुस्ती स्पर्धा या क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान असून त्यांचा कार्यकर्तुत्वाचा सन्मान होत असल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
Leave a reply