अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे :अणदूर येथील स्वामी समर्थ हार्डवेअर अँड पेंटस उद्योगाचे मालक संतोष मुळे यांचा वाढदिवस जय मल्हार पत्रकार संघ, दिशाशक्ती परिवार व मित्र परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.युवा उद्योजक व प्रत्येकाच्या सुखदुःखात समरस होऊन मार्ग दाखवणारा, शून्यातून युवा पिढीला आदर्श प्रेरणा देणाऱ्या संतोष मुळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी जय मल्हार पत्रकार संघ व दिशाशक्ती परिवाराच्या वतीने गाव दर्शन न्युजचे संपादक तथा पुण्यनगरीचे प्रतिनिधी शिवशंकर तिरगुळे यांच्या हस्ते युवा उद्योजक संतोष मुळे यांचा सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना मुळे म्हणाले की, शिक्षण हे केवळ नोकरीचे साधन नसून तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता स्वतःच्या हिमतीवर उद्योग धंद्यात उडी घेऊन स्वतःचे भविष्य स्वतः घडवावेत. उद्योगाच्या माध्यमातून स्वतःचे, कुटुंबाचे व समाजाचे हित अंगीकरण्याची आवश्यकता असल्याचे भावना यावेळी व्यक्त केली.
यावेळी सर्वश्री. चंद्रकांत हगलगुंडे, श्रीकांत अणदूरकर, सुनील चव्हाण, राम भंडारकवठे, बाबा तांबोळी, कदम साहेब, मल्लिनाथ मुळे, सिकंदर अंगुले, म्हांतप्पा मैत्री, काशिनाथ गाढवे, सतीश सारणे सह शैक्षणिक, सामाजिक , राजकीय व उद्योग क्षेत्रातील मान्यवरानी प्रत्यक्ष भेटून तर काहींनी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.
जय मल्हार पत्रकार संघ व दिशाशक्ती परिवाराकडून उद्योजक संतोष मुळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

0Share
Leave a reply