अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : अणदूर येथील वत्सलानगर झोपडपट्टीत राहणारा , ना धर्म, ना जात, ना पक्ष सर्वांच्याच मदतीला धावून जाणारा हरहूनरी युवक शिवा अष्टेकर याचे दिनांक 16 रोजी विहिरीत पडून दुर्देवी अंत झाला. त्याचे इतर सोपस्कार कोण पडणार हा प्रश्न आ वासुन उभा असतानाच माणुसकीचा झरा कोठे ना कोठे धावून जातो तसे येथील सर्वांच्या मदतीला, अडचणीला धाऊन जाणारा अर्थात पदरमोड करून कसलाही गाजावाजा न करता अण्णासाहेब अरविंद आलूरे व त्यांच्या मित्र परिवाराने शिवा आष्टेकरला धो धो पाऊस , माणसाची कमतरता अशा बिकट परिस्थितीत ही जड अंतकरणानी निरोप देण्यात आला .
ग्रामीण भागात आजही माणुसकी जिवंत असल्याची जाणीव मात्र झाल्याशिवाय राहणार नाही. अणदूर हे जवळपास तीस हजार वस्तीचे गाव असून शहरीकरण होत असले तरी सामाजिक, धार्मिक, सुखदुःखात येथील तरुण नेहमीच अग्रेसर असतो. जगी ज्यासी कोणी नाही. त्याची देव तर आहेच पण माणसातील माणुसकी जपणारी अण्णासाहेब सारखे तरुण सर्वस्वाचा त्याग करून रात्री अप रात्री धावून येतात याची प्रचिती मात्र पंचक्रोशीत पुन्हा सिद्ध झाली आहे. अशा या संवेदनशिल प्रसंगी तरुण पिढी बरोबर येथे हे खरोखरच प्रेरणादायी म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
यावेळी नळदुर्गचे पोलीस निरीक्षक कागुले, बीट अंमलदार शिंदे, दिपक आलूरे,नवनाथ मिटकरे, केदार लंगडे, युवराज होळे,अनिल आळंगे, विकास मुळे, काकासाहेब पोतदार, काशिनाथ घुगे , रवि मुळे,उपस्थीत होते.
Leave a reply