अहमदपुर प्रतिनिधी / नंदराज पोले : शिक्षण हे जादूची कांडी आहे. शिक्षणामुळेच माणसाची किंमत वाढते तुमच्यामध्ये जिद्द ,चिकाटी, मेहनत आणि अभ्यासातील सातत्य व नियोजन करून आई-वडिलांच्या डोळ्यातील स्वप्न पूर्ण करा असे आवाहन प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी केले. सुनेगांव (शेंद्री) येथील आर्मी अमोल सुधाकर जायभाये व गावकरी बांधवांच्या वतीने दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.मारोती बुद्रुक पाटील बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की फक्त जिद्द ठेवा.आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही होऊ शकते आयुष्य कठीण आहे. पण फक्त तक्रार करून ते सोपेही होणार नाही म्हणून सतत प्रयत्न करत राहा.संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणीही यशस्वी होत नाही. जोपर्यंत छन्नीचा घाव घेत नाही तोपर्यंत दगडसुद्धा देव होत नाही.ध्येय मोठे ठेवा,कारण लहान स्वप्ने मनाला कधीच मोठे बनवू शकत नाहीत.प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो, फक्त ती ओळखायची कला आत्मसात करून आई-वडिलांच्या डोळ्यातील स्वप्न पूर्ण करून राष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी आपण कार्य करा असेही त्यांनी सांगितले.
सर्व प्रथम 10 आणि 12 वीत प्रथम द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी लखन पंडित जायभाये (99.40),ऋतुजा तुकाराम काटे 98.60, वैष्णवी नामदेव जायभाये 98, एकनाथ विठ्ठल जायभाये 90.40, शीतल बापूराव जाधव, भरत लक्ष्मण थगनर, दिव्या ज्ञानोबा जाधव, बाबुराव हनुमंत काटे, दिक्षा बालाजी वाघमारे, गणेश मारोती जायभाये, आदिचा सन्मान करण्यात आला.
यावेळी यादवराव काटे, माधवराव थगनर, उद्धव थगनर, विठ्ठल जायभाये, माधव काटे, सुधाकर जायभाये,आर्मी विष्णू जायभाये, मधुकर केंद्रे,नामदेव जायभाये,श्रीराम काटे, बाबु जायभाये, व्यंकटी काळे, यांची उपस्थिती होती..
विद्यार्थ्यांनो आई-वडिलांच्या डोळ्यातील स्वप्न पूर्ण करा – प्रा.मारोती बुद्रुक पाटील

0Share
Leave a reply