Disha Shakti

राजकीय

शनिशिंगणापूरच्या ग्रामसभेत लटकु बाबत वादळी चर्चा पोलीस प्रशासनास निवेदन, राहुरी ते शिंगणापूर पर्यन्त लटकुंचा मोठया प्रमाणात वावर

Spread the love

प्रतिनिधी / मोहन शेगर : काही दिवसापूर्वी शनिशिंगणापूरचे माजी सरपंच शिवाजीराव शेटे यांच्यावर त्यांच्या हॉटेलच्या काउंटरवर असताना हॉटेलच्या काउंटर असताना हल्ला करण्यात आला होता त्यातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतली होती याआधी सुद्धा ग्रामसभेचा लटकू बाबत कारवाई करणे साठी पोलिसांना ग्रामसभेचा ठराव देण्यात आला होता मात्र पोलीस प्रशासनाकडून याच्यावर कुठलीच ठोस कारवाई झाली नसल्याने माजी सरपंचावर हल्ला करण्यात आला.

दि 22 रोजी शनिशिंगणापूर ग्रामपंचायतच्या सरपंच सौ पुष्पा बाळासाहेब बानकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा बोलावण्यात आली होती या ग्रामसभेला शनिश्वर देवस्थानचे उपाध्यक्ष विकास बानकर मुळा सहकारी साखर कारखान्याचे संचालक बापू तात्या शेटे , माजी सरपंच बाळासाहेब बानकर यांच्यासह शनिशिंगणापूर ग्रामपंचायतचे सदस्य उपस्थित होते मात्र शनिश्वर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर या ग्रामसभेला उपस्थित नव्हते. 

यामध्ये अध्यक्षांच्या पार्किंग मध्येच जास्त लटकू असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला त्याचप्रमाणे शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके हे सुद्धा ग्रामसभेला उपस्थित नसल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा आक्रोश दिसून आला.ही ग्रामसभा शनिशिंगणापूर देवस्थानच्या सभामंडपामध्ये झाली या सभेमध्ये सर्वांनीच माजी सरपंच शिवाजी शेटे यांच्या वर झालेल्या हल्ल्यास जबाबदार पोलीस प्रशासन असल्याचे म्हटले

त्यांच्याकडून ग्रामपंचायतचा ठराव घेऊन सुद्धा कारवाई केली जात नसल्यामुळे लटकुची दादागिरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे ग्रामसभेचा ठराव देऊन सुद्धा एका माजी सरपंचावर हल्ला होतो ही शनिशिंगणापूरकरिता दुर्दैवाची गोष्ट असल्याची ग्रामस्थांचे म्हणणे आहे ग्रामसभा झाल्यानंतर याबाबत पोलीस प्रशासनाला जाब विचारण्यासाठी सर्व ग्रामस्थ पोलीस स्टेशन पुढे जमा झाले व पोलीस प्रशासनाला याबाबत निवेदन दिले.

या निवेदनामध्ये शनिशिंगणापूर मध्ये मोठ्या प्रमाणात चालणारे अवैद्य धंदे तसेच गांजा व दारू मटका क्लब व पोलीस स्टेशन समोरच रस्त्याला उभे राहून भाविकांच्या गाड्यांना अडवणारे कमिशन एजंट यांचा चोक बंदोबस्त पोलीस प्रशासनाने त्वरित करण्यात यावा व रस्त्यावर फळ विक्रेत्यांच्या गाड्या त्वरित हटवण्याची मागणी ग्रामस्थांनी या निवेदनात केली आहे तसेच शनिशिंगणापूर या ठिकाणी असणाऱ्या भिकाऱ्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली व ग्रामसभेचा ठराव पोलीस प्रशासनाला देण्यात आला यावर पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास सर्व ग्रामस्थ शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या प्रसंगानंतर शनिशिंगणापूर मध्ये पोलीस प्रशासन आहे की नाही हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे तसेच यापूर्वी देखील शिंगणापूर पोलीस स्टेशन समोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती याचीच पुनरावृत्ती म्हणून माजी सरपंचावर हल्ला करण्यात आला ही दुर्दैवी घटना आहे पोलीस प्रशासन मोठ्या घटनेची वाट पाहते की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. जर या कमिशन एजंट व अवैध धंद्यावर कारवाई न झाली तर मी माझ्या पत्नीसह पोलीस स्टेशन समोर आत्मदहन करेन

माजी सरपंच. बाळासाहेब बांनकर शनिशिंगणापूर ग्रामपंचायत


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!