Disha Shakti

Uncategorized

कोंढवड येथे आजादी का अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रम

Spread the love

राहुरी प्रतिनिधी (प्रमोद डफळ) राहुरी : तालुक्यातील कोंढवड येथे आजादी का अमृत महोत्सव निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी राजमाता जिजाऊ महिला ग्रामसंघाच्या माध्यमातून महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.

आजादी का अमृत महोत्सव निमित्त ‘ हर घर तिरंगा ‘ उपक्रमांतर्गत महिलांना ग्रामपंचायत कार्यालयातून राष्ट्रध्वज देऊन या देशव्यापी आभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच ग्रामसेवक शिवाजी पल्हारे यांनी राष्ट्रध्वजाचा वापर करताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली. ग्रामपंचायत व अंगणवाडी परिसरात ग्रामसंघाच्या सामाजिक मुल्यमापन समितीच्या कमल म्हसे, मंगल म्हसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष संवर्धनासाठी महिलांना विविध प्रकारचे वृक्ष भेट देण्यात आले. यावेळी अंगणवाडीतील लहान मुलांना शंकर औटी यांनी खाऊ दिला.

या कार्यक्रमास कोंढवड सोसायटीचे माजी व्हा. चेअरमन जगन्नाथ म्हसे, माजी व्हा. चेअरमन मधुकर रामदास म्हसे, बंडु म्हसे, क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, बाबासाहेब माळवदे, देविदास म्हसे, बबन सातपुते, सीआरपी राधिका म्हसे, कृषी सखी सुप्रिया म्हसे, राजमाता जिजाऊ महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा वैशाली म्हसे, सरिता म्हसे, शोभा म्हसे, नंदिनी म्हसे, प्रतिभा औटी, मीना म्हसे, उषा पवार, मेघना म्हसे, छाया शेजवळ आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!