नांदेड प्रतिनिधी/ धम्मदिप भद्रे : आजादी का अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत नायगाव येथे नांदेड जिल्ह्याचे खा.प्रताप बसतील चिखलीकर आ. राम पाटील रातोळीकर यांच्या उपस्थितीत 5000 तिरंगा वाटप व दोन हजार मोटारसायकल स्वारांसह व 5 हजार देशभक्त विद्यार्थी आणि भारतीय नागरिक यांच्या स्वयंस्फूर्त सहभागातून १२ आगस्ट रोजी नायगाव शहर व तालुक्यात भव्य दिव्य रैली भाजपच्या वतीने काढण्यात आली होती
भारतीय स्वातंत्र प्राप्तीस 75 वर्ष पूर्ण झाल्या बद्दल देशभरात आझादी का अमृत महोत्सव अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टी नायगाव जिल्हा नांदेड च्या वतीने हर घर तिरंगा अभियान दिनांक 12 ऑगस्ट रोज शुक्रवार या दिवशी नायगाव शहरातील होटाळकर यांच्या मिलिनीयम पब्लिक स्कुल च्या भव्य पटांगणावर 5000 तिरंगा ध्वजाचे उपस्थितांना वाटप करन शाळेतीळ विद्यार्थी यांनी 75 वर्ष स्वातंत्र्याचे हे मानवी साखळीच्या आकड्यातून चित्र उभारून प्रशंसनीय प्रदर्शन केले. नायगाव शहर व तालुक्यात भव्य दिव्य दोन हजार मोटरसायकलची व 5 हजार देशभक्त विद्यार्थी यांची भव्य दिव्य तिरंगा रॅली लक्ष विधी एक आगळेवेगळे आकर्षण ठरली.या रैलीत संबंध तालुक्यातुन स्वस्फुर्त पणे नागरिक कार्यकर्ते यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर श्री. दत्त शिक्षण प्रसारक मंडळ होटाळा तालुका नायगाव संस्थेतील सर्व प्राथमिक माध्यमिक, ज्युनिअर कॉलेज, जवळपास 5000 विद्यार्थी तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर (लोकसभा सदस्य नांदेड) मा. आमदार राम पाटील रातोळीकर (विधान परिषद सदस्य) मा. गंगाधर जोशी (महामंत्री भाजप नांदेड) ,मा. व्यंकटराव पाटील गोजेगांवकर (भाजपा जिल्हा अध्यक्ष नांदेड ),मा. किशोर देशमुख (युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाजपा नांदेड) शिवराज पाटील होटाळकर (माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद नांदेड तथा जिल्हा सरचिटणीस भाजपा नांदेड) मा.राजेश कुंटूरकर (अध्यक्ष कुंटूर शुगर ऍग्रो लिमिटेड) भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार मा.श्रावण पाटील भिलवंडे (जिल्हा सरचिटणीस भाजपा नांदेड) मा.लक्ष्मणराव ठक्करवाड( जिल्हा सरचिटणीस भाजपानांदेड) मा.माणिकराव लोहगाव (माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड) दिलीपराव धर्माधिकारी, मा.गजानन शिंदे (तहसीलदार नायगाव) मा.अभिषेक शिंदे (पोलीस निरीक्षक नायगाव) शंकर पाटील कल्याण (शहराध्यक्ष भाजपा नायगाव), भगवानराव लंगडापुरे, गजानन चव्हाण, संजय पाटील इज्जतगावकर, मोहनराव पाटील भिलवंडे, साईनाथ अक्कमवाड, आनंद बावने,संजय मोरे,रावसाब मोरे,सुरेश कदम ,राजेंद्र रेड्डी, नागराव पाटील शेळगावकर, व्यंकट कोकणे, कैलास भालेराव, शंकर वडपत्रे, सुरेश पाटील खांडगावकर, शिवा पाटील गडगेकर, दत्तू पाटील होटाळकर, शिवाजी पाटील सावरखेड, शिवाजी पाटील होटाळकर, प्रदीप देमेवार,महेश शिंदे, भाऊराव पाटील पवार, मनोहर पाटील हिवराळे, राम खनपटे, विलास पाटील धुपेकर, भगवान भद्रे, संजय बन, जुने पठाण, श्रीराम पवार, महेश पाटील पवार, चंद्रकांत पवार,व सर्व नायगाव तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
या भव्य रैलीचे मुख्यआयोजक शिवराज पाटील होटाळकर (भाजपा जिल्हा सरचिटणीस नांदेड तथा माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद नांदेड) यांनी केलेले सुरेख नियोजन व रैलीतील देशभक्ती पर गीतांचा कार्यक्रम, घोषणा,नरसी, नायगाव,होटाळा,गडगा,मांजरम , कोलंबी आदी ठिकाणच्या ग्रामस्थांनी केलेल भव्य स्वागत यामुळे रैलीला व कार्यक्रमात देशभक्तीचे वातावरण संपूर्ण तालुक्यात निर्माण झाले.कोलंबी येथे रैलीचा समारोप करण्यात आला