राहुरी प्रतिनिधी (प्रमोद डफळ) दि. 15 ऑगस्ट : “राष्ट्र प्रेमाचे बाळकडू विद्यार्थ्यांना लहान वयात मिळाले तर ते भारताचे उज्वल भविष्य असतील” असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुभेदार बाबासाहेब तारडे यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त श्री उत्तमराव पवार हे होते. या कार्यक्रमांतर्गत विद्यालयात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले अमृत महोत्सव अंतर्गत झालेल्या केंद्रस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे सुभेदार बाबासाहेब तारडे यांनी आपल्या सैन्यदलातील आठवणी विद्यार्थ्यांना सांगितल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली व आपले देश प्रेम व्यक्त केले विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाषणे केले. पालकांनी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार संस्थेचे उपाध्यक्ष गणेश जी शेळके विश्वस्त उत्तमराव पवार युवराज पवार भास्करराव पवार सचिव डॉ. प्रकाश पवार खजिनदार डॉ. किशोर पवार यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल फाटक व विजय शिंदे यांनी केले व आभार शारदा कोकाटे यांनी मानले.
या कार्यक्रमास मुख्याध्यापिका छाया जाधव, किरण तारडे, सचिन जाधव, दादासाहेब झावरे, भाऊसाहेब करपे ,विजय शिंदे सर, गणेश बर्डे ,अरुण खिलारी,मयूर धुमाळ प्रियंका पांढरे, सुवर्णा थोरात, सविता गव्हाणे, शितल फाटक, सुजाता तारडे, रोहिणी भाकरे, प्रिया लांबे, अनिता लांबे, शारदा कोकाटे, तनुजा झुगे व लिपिक सचिन कोळेकर, शारदा तमनर, परिवहन विभाग प्रमुख सोमनाथ लांबे तसेच विद्यार्थ्यांचे पालक आदी उपस्थित होते.