अ.नगर प्रतिनिधी / युनूस शेख : गेल्या आठवड्यात आ.प्राजक्त तनपुरे यांनी संजय गांधी निराधार योजनेची बैठक 4 महीने न झाल्याच्या कारणावरुन राहुरीत 2 महिन्यापुर्वी आलेले तहसिलदार यांना विनाकारण दमबाजी करत स्टंटबाजी करत 150 लोकांना लाभ मिळऊन दिल्याच्या खोट्या वल्गना करत आहे.
यावेळी काही कार्यकत्यांच्या फोटो पुरावे व सांगन्यावरुन भाजप कार्यकर्ते कागद खालीवर करता त्यावर आ.प्राजक्त तनपुरे म्हणाले हे कार्यालय काय भाजपच कार्यालय आहे का, गेल्या सरकारच्या काळात आमदार प्राजक्त तनपुरे मंत्री मंडळात ऊर्जा राज्य मंत्री असताना त्यावेळी शेतकरी मोठ्या संकटात असताना तनपुरेंनी विद्युत महावितरण अधिका-यांच्या मार्फत विद्युत पुरवठा ख॔डीत करुण संक्तीची विजबिल वसुली करून शेतक-यांचे पिके जाळुण त्यांना रात्रीच्यावेळी कांदा लागवड करण्यास भाग पाडले व धरणात पाणी साठा असुनही रब्बी हंगामात उशिराने रोटेशन केले, म्हणून या शेतक-यांवरील अन्यायाच्या विरोधात आमचा प्रहार जनशक्ती पक्ष सरकारमध्ये सत्तेत सहभागी असताना शेतक-यांच्या हीतासाठी व न्याय हक्कांसाठी विद्युत महावितरणाच्या विरोधात राहुरी कृषीउत्पन्न बाजार समीती समोर दिनांक-2 डिसेंबर 2021 रोजी आंदोलन केले.
त्यावेळी आ.तनपुरेंनी आपल्या मंत्री पदाचा गैरवापर करुण पोलीस प्रशासनावर दबाव टाकुण आपल्याच मित्रपक्षातील 5 शेतक-यांच्या ज्वलंत प्रश्नावर आंदोलन करणा-या कार्यकर्त्यावर 353 सरकारी कामात अडथळा व ईतर 8 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले त्यावेळी माझ्यासह 5 आंदोलकांना 15 दिवस पोलीसांच्या कोठडीत ठेवले व पोलीसांना मारहाण करणयाचे आदेश दिले,त्यावेळी पोलीस काय आ.तनपुरेंचे वैयक्तीक नौकर होते का, त्याचवेळी आ.तनपुरेनी आपण स्वता शेतकरी विरोधी असल्याचे दिसून आले. हे सर्व राहुरी नगर पाथर्डी विधान सभा कार्यक्षेत्रातील स्वाभीमानी शेतकरी मतदार कदापीही विसरणार नाही.
यापुढे आ.प्राजक्त तनपुरे यांनी अधिका-यांपुढे नौटंकी करून आंदोलन केल्यास त्यांच्यावरही 353 सारखे गुन्हे दाखल करा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष-श्री.सुरेशराव लांबे पाटील यांनी केली आहॆ. गेल्या वर्षी खरीप हंगामात संपूर्ण महाराष्ट्रासह राहुरी तालुक्यात अतिवृष्टी व सततच्या पावसाने कांदा, सोयाबीन, कपाशी व फळबागा व तसेच ईतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाल्यावर शिंदे फडणवीस शासनाने एनडीआरएफ निकशाच्या दुप्पट मदत शेतक-यांना देण्याचे जाहीर करुन 3 हेक्टर पर्यत क्षेत्राची मर्यादा करुन तहसिलदारांना पंचनामे करण्याचे आदेश दिले.
तहसिलदार यांनी मंडळ अधिकारी,तलाठी,कृषी अधीकारी, ग्रामसेवक,यांना आदेश दिले,राहुरी तालुक्यातील सात महसुल मंडळातील 45 हजार शेतक-यांचे पंचनामे करुन शासनाने जाहीर केलेल्या रक्मे नुसार 80 कोटी 17 लाख नुकसान झाल्याची माहीती मंडळ अधिकारी यांनी तहसिलदार यांना दिली, व तहसिलदारांनी राज्य शासनाला सादर केली. त्यावेळी तहसिलदार यांनी आपली जबाबदारी चोख पध्दतीने पार पाडली, संपुर्ण राहुरी तालुक्यातील सात महसुल मंडळात समान अतिवृष्टी पाऊस होऊन 45 हजार शेतक-यांचे अंदाजे 32 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले.
परंतु प्रशाननातील शासकीय अधिकारी यांनी शासनाच्या अपत्ती व्यवस्थापन निकाषाच्या जीआर प्रमाणे म्हणजे ज्या मंडळात सलग 24 तासात 65 मि.मि.पेक्षा जास्त पाऊस झाला त्या मंडळाला अनुदान मंजुर केले,त्या निकषा प्रमाणे राहुरीतील 7 मंडळा पैकी एकमेव राहुरी मंडळातील 6 हजार 689 शेतक-यांचे 4 हजार 799 हेक्टर क्षेत्राला 12 कोटी 84 लाख अनुदान मंजुर झाले, व टाकळीमिया, ताहाराबाद, देवळाली प्रवरा, ब्राम्हणी, वांबोरी, सात्रळ, या सहा मंडळातील 38 हजार शेतकरी अनुदाना पासुन वंचीत राहीले त्यावेळी आ.प्राजक्त तनपुरे गप्प बसले.
त्यानंतर राज्य शासनाने मागील खरिप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट मदतीचा जीआर 27 मार्च 2023 रोजी रद्द करुन जुन्या निकषात किंचित वाढ करुन पुढील तीन वर्षासाठी नविन जीआर काढुन शेतक-यांचे एकरी 4 हजार अनुदान कमी केले त्यावेळी आ.प्राजक्त तनपुरे गप्प का बसले, 6 महिन्या पुर्वी मंजुर झालेले राहुरी मंडळातील अतिवृष्टीचे अनुदान अजुनही 2 हजार 456 शेतक-यांना मिळाले नाही यावर आ.प्राजक्त तनपुरे का बोलले नाही.
या पुर्वी राज्य शासन नुकसानग्रस्त शेतक-यांची मदत जिल्हास्तरावर पाठवत होते व जिल्हास्तरावरुन तालुक्यांना निधी दिला जात होता त्यात दिनांक-24 जानेवारी 2023 ला बदल होऊन नुकसानग्रस्तांच्या मदतीचे वितरण थेट मंत्रालयातुन पिडीतांच्या बॅक खात्यात जमा होत असल्याचीही माहीतीही अजुनही आ.प्राजक्त तनपुरे यांना नाही, त्यांनी तहसिलदार यांना विचारले तेव्हा त्यांना समजले,तनपुरे आमदार होऊन 4 वर्ष होत आली त्यांना आजपर्यतही समजले नाही की शासनाचा नियम आहे.
संजय गांधी निराधार योजनेची बैठक ही प्रत्येक महीन्याला घ्यावीच लागते, ही धक्कादायक माहीती त्यांना 4 वर्षानंतर खोलात गेल्यावर मिळाली, आ.प्राजक्त तनपुरे म्हणतात की आम्ही आज इथे आलो नसतो तर या 150 लोकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळाला नसता,आमदार साहेब तुम्ही नसते आले तरी त्यांना प्रशासनाने लाभ दिला असता पण तुम्हाला चार वर्षा नंतर खोलात गेल्यावर तुम्हांला ही धक्कादायक माहीती मिळाली
आमदार तनपुरे यांच वय जरी योग्य असल तरी त्यांना सर्वसामान्य व शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल अनुभव फारच कमी आहे. त्यांना सर्वसामान्यांचे व शेतक-यांचे प्रश्न व्यथा समजून घेण्याकरिता आ.तनपुरे यांना खुपच खोलात जावे लागेल तेव्हा त्यांना कळेल शेतक-यांचे जीवन किती धक्कादायक व धोकादायक आहॆ अशी खोचक टिका व आरोप करुन शेतक-यांच्या व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर नौटंकी आदोलन करून स्टंटबाजी करणाऱ्या आ.तनपुरे यांच्याबद्दल अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना शेतकरी व सर्वसामान्यांचे नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी दिले.
शेतक-यांच्या ज्वलंत प्रश्नावर आंदोलन करणा-या आंदोलकांवर गुन्हे दाखल करणा-या आ.तनपुरेनी आंदोलनाची नौटंकी करु नये- सुरेशराव लांबे पाटील

0Share
Leave a reply