Disha Shakti

Uncategorized

जेऊर बीटची शिक्षण परीषद उत्साहात संपन्न

Spread the love

प्रतिनिधी (अक्षय वरकड ) : मा. मुख्यकार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी साहेब जि.प.सोलापूर यांचे प्रेरणेतून , गटविकास अधिकारी श्री.मनोज राऊत साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री राजकुमार पाटील साहेब व विस्तार अधिकारी श्री जयवंत नलवडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व बीटमधील सर्व केंद्रप्रमुख यांचे नियोजनानुसार दिं 20/8/2022रोजी जेऊर बीटची शिक्षण परीषद भारत हायस्कूल,जेऊर येथे मोठ्या उत्साहात पार पडली.या शिक्षण परीषदेचे अध्यक्ष भारत हायस्कूल ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य केशव दहिभाते सर व प्रमुख पाहुणे भारत प्रायमरी स्कूल चे मुख्याध्यापक दिपक व्यवहारे सर ,सुपरवाझर कांबळे सर होते.

या शिक्षणपरीषदेची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करुन परीपाठाने करण्यात आली.निपुण भारत – F.L.N. भाषा व गणित विषय मार्गदर्शन श्री. भांगे वस्ती शाळेचे बनकर सर व अनिल कुलकर्णी सर यांनी केले. शैक्षणिक दशसुत्री कार्यक्रम व्हीजन 2022-23 या विषयी श्रीम. रोहिणी वीर मॅडम, श्रीम. होरणे मॅडम, श्री बनकर सर, अनिल कुलकर्णी सर ,सुदाम जाडकर सर , तुकाराम तळेकर सर , भंडारे सर, फौजमल पाखरे सर श्रीकृष्ण भिसे सर, युवराज चव्हाण सर यांनी केले.

जेऊर व चिखलठाण केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीमती वंदना पांडव मॅडम यांनी विद्याप्रवेश या विषयी व गिरीश धुमाळ सर यांनी विद्यांजली पोर्टल बदल माहिती सांगितली. विस्तार अधिकारी श्री जयवंत नलवडे साहेब यांनी प्रशासकिय माहिती दिली. आणि आज झालेल्या दशसुत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी असे सांगितले.यावेळी विविध पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचा, जिल्हा स्तरावर नृत्य व लेझिम पथक कार्यक्रम सादर केलेल्या शिक्षकांचा व स्वच्छ शाळा सुंदर शाळा तालुक्यातील प्रथम तीन क्रमांक आलेल्या शाळेतील मुख्याध्यापक या सर्वाचे सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री नवनाथ मारकड सर व फौजमल पाखरे सर यांनी केले. शिक्षण परीषद यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख वंदना पांडव मॅडम, केंद्रप्रमुख महेश कांबळे सर, केंद्रप्रमुख साईनाथ देवकर सर, केंद्रप्रमुख तोरमल सर विवेक पात्रुडकर सर यांनी सहकार्य केले. केंद्रप्रमुख तोरमल सर यांनी आभार मानून शिक्षणपरीषदेची सांगता करण्यात आली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!