Disha Shakti

Uncategorized

सिंहनाद युवक प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी चे भाजपा नेते बालाजी बच्चेवार यांच्या हस्ते उत्साहात उद्घघाटन संपन्न

Spread the love

जिल्हा प्रतिनिधी (धम्मदिप भद्रे कांडाळकर) : काल दिनांक 20/08/2022रोजी शनिवारी सिंहनाद युवक प्रतिष्ठान, धर्माबाद च्या वतीने भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धर्माबाद चे माजी नगराध्यक्ष माननीय श्री विनायक रावजी कुलकर्णी साहेब, कार्यक्रमाचे उद्घाटक भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य माननीय श्री बालाजी बच्चेवार साहेब हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, माजी नगरसेवक संजय पवार,गणेश गिरी,रमेश तिवारी,कृष्णा तिम्मापुरे,सखाराम निलावार,राजु सुकुटवार, पत्रकार जी.पी. मीसाळे,महेश जोशी,गंगाधर धडेकर, शिवराज पा गाडीवान,संजय पा टाकळीकर सिंहनाद युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनुप कासलीवाल, संतोष येरावार,पवन संगावार, छोटू पाटील, साईनाथ शिरपूरे,श्याम बोईनवाड हे उपस्थित होते,

यावर्षी दहीहंडी नांदेड चे चौफाळा युवक गोविंदा पथक,नांदेड यांनी ही दहीहंडी फोडली,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष,अमित मुंदडा, धनंजय बोधनकर,मनोज काळे,चेतन सोनी,साईप्रसाद फेकमवार,विनय गादेवार,सुमित बोधनकर ,सूर्यकांत राखोंडे ललेश पा मंगनाळीकर, दत्तात्रय कावडे ,विजय स्वामी,गजानन चंदापुरे,चक्रेश पाटील, सज्जन गड्डोड साईप्रसाद कदम, योगेश डोईजड, क्षितीज अप्पा यांनी परिश्रम घेतले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!