जिल्हा प्रतिनिधी/ गंगासागर पोकळे : दोन वर्षांनंतर संपूर्ण महाराष्ट्रात गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात साजरे होत असतानाच अनंत चतुर्दशीच्या दिवशी संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथे गणपती विसर्जणासाठी गेलेला भाचा बुडत असल्याचे पाहून त्याला वाचावण्यासाठी दोन मामा व त्याच्या मित्रांनीही जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने व नदीत वाळू वाहतूक केलेल्या खड्ड्याचा अचूक अंदाज न आल्याने वाहून चाललेल्या चार ही तरुणाचे दैव बलवत्तर असल्याने त्या ठिकाणी उपस्थीत असलेल्या तरुणानी स्वतःच्या जीवाची बाजी पणाला लावून दाखवलेल्या प्रसंगसावधानतेमुळे या चारही मामा भाचे या तरुणांना बुडण्यापासून वाचवण्यात यश आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी दुपारनतंर चणेगाव येथील प्रवरानदी पात्रात गणपती विसर्जनसाठी परिसरातील नागरीक घरगुती गणपती तसेच गणेश मंडळाचे गणपती येत होते. सांयकाळी ५ वाजेच्या सुमारास गणपती विसर्जन सुरु असताना गौरव वडीतके हा तरुण पाण्याचा वेग जास्त असल्याने पाण्यात बुडायला लागला होता.
यावेळी आपला भाचा गौरव वडीतके हा बुडत असल्याचे पाहून जीवाची पर्वा न करता मामा मयुर दिलिप शेळके व बाळासाहेब चिमाजी शेळके तसेच त्याचां मित्र योगेश उत्तम साळुंखे याने पाण्यात उडी घेत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.
मात्र गढूळ पाणी व वेगवान प्रवाह यामुळे हे चौघेही बुडत असल्याचे लक्षात येताचं मेजर सचिन शिवाजी बर्डे, विकास सोनवणे व कैलास दुकळे यानी प्रसंगसावधान दाखवून पाण्यात उड्या घेत शोधाशोध करून या तरुणाना भागवत साळुंखे, सोमनाथ ढमक, उत्तम साळुंखे, लहानू खेमनर, लक्ष्मण आहेर, पुंजा राजणार, बाळासाहेब पावडे, शंकर गेणू खेमनर, शंकर आहेर आदिसह तेथे उपस्थित असलेल्या गणेश मंडळातील तरुणाच्या मदतीने पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले.
घटनेचे गाभिर्य लक्षात घेत या तरुणाना तात्काळ विठ्ठलदास बालकिसन आसावा व प्रतिक शंकर खेमनर हे आपल्या वाहणातून सोनगाव येथील डॉ. राहुल बोरा यांच्याकडे प्राथमिक उपचारासाठी घेऊन गेले. पुढील उपचारासाठी या चौघाना लोणी येथिल प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या चौघाची प्रकृती ठणठणीत असून त्याना घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान आश्वीसह पंचक्रोशीत गणपती विसरर्जन शांतपणे तसेच मंगलमय वातावरणात पार पडले. आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली भर पावसात ठिकठिकाणी चोख पोलीस बदोबस्तं ठेवण्यात आला होता. आश्वी बुद्रुक येथे प्रवरा नदीतिरावरील आम्रेश्वर मंदिरालगत व आश्वी खुर्द येथिल प्रवरा उजव्या कालव्यालगत गणेश भक्तासाठी गणपती विसर्जणाची सोय करण्यात आली होती.