Disha Shakti

Uncategorized

डीजेवर दोन गाण्याची घोषणा अन् पुण्याचे पोलीस आयुक्त अभिताप गुप्ता संतापले;

Spread the love

प्रतिनिधी / रमेश खेमनर ) पुणे : रात्री बारा नंतर डीजे म्हणजेच साउंडला बंदी. त्यात कुमठेकर रस्त्यावरून आलेल्या एक गणेश मंडळाचा देखावा. पोलिसांनी सांगूनही दीड तास एकाच जागेवर. अशा वेळी त्या मंडळाच्या अध्यक्षाने महापालिका स्वागत मंडपात येऊन स्पीकरवरून दोन गाणी वाजवा असे डीजेला सांगितले.

त्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता संतापले. त्यांनी थेट मनपा स्वागत मंडपात येऊन कोण तो पत्रकार ज्याने गाणी लावण्यास सांगितले? असा संतप्त सवाल केला. परंतु, तोपर्यंत ज्याने घोषणा केली तेही व्यासपीठावर नव्हते. मग काय, आहे तो राग उपस्थितांवर निघाला. त्याचवेळी घोषणा करणाराही गायब झाला.

 

सीपींनी आधीच त्या मंडळाला पुढे चला म्हणून सांगून वैतागलेले असताना ती गाणी लावण्याची घोषण आगीत तेल टाकून गेली. पण अखेरीस ते मंडळ ही पुढे मार्गस्थ झाले. आणि सर्व वातावरण शांत झाले. मात्र सीपी साहेबांचा तो रुद्र अवतार सर्वांना आवक करून गेला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!