मुंबई प्रतिनिधीं (दिशा शक्ती न्यूज नेटवर्क) मुंबई कांदिवली पश्चिम मधील पत्रकार, व साहित्यिक भारत कवितके यांना ८ आक्टोंबर २०२२ शनिवार रोजी वाढदिवसानिमित्त हार्दीक शुभेच्छा! भारत कवितके यांचे मूळ गाव पंढरपूर, भारत कवितके हे कवी, लेखक, पत्रकार, परीक्षक, समिक्षक, सामाजीक चळवळीतील एक पारदर्शक, प्रामाणिक कार्यकर्ते, (धनगर समाज) माजी सेवानिवृत होमगार्ड आधिकारी के परीमंडळ कांदिवली समादेशक आधिकारी, सेवानिवृत मुंबई महानगरपालिका आरोग्य खाते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनपा सर्व साधारण रुग्णालय कांदिवली सिनीयर शस्त्रक्रियागार सहायक पदावरुन व विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कामाबद्दल गोवा,मध्यप्रदेश, आसाम, दिल्ली, गुजरात व मुंबईसह महाराष्ट्र या ठिकाणाहून आतापर्यंत १०३३ पुरस्कार (एक हजार ) चे मानकरी असून मुंबई सह महाराष्ट्र तील अनेक सामाजीक संस्थाच्या लहान मोठ्या पदावर आपले कार्य चोखपणे, प्रामाणिकपणे निष्ठेने, पारदर्शकपणे बजावत आहेत.आता पर्यंत भारत कवितके यांची सात पुस्तके प्रकाशित झाली असून सातही पुस्तकांना वेगवेगळ्य़ा ठिकाणाहून पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
दै.वृत्तमानस मुंबई, दै.मुंबई लक्षदिप, दै.तुफान क्रांती सांगोला, दै.आदर्श महाराष्ट्र मुंबई, दै.चौफेर संघर्ष मुंबई दै.रामदिन मुंबई, दै.डहाणू मित्र पालघर,दै.साक्षीवंदना बुलढाणा,सा.भगवे वादळ मुंबई, सा.मुंबई संध्या गोरेगांव, दै.बाळकडू बारामती, दै.धनगर शक्ती, सा.अहिल्या वार्ता, सा.अहिल्या सरकार, सा.अशोकरत्न पुणे, दै.झुंझार केसरी जालना, दै.ठाणे जीवन वार्ता, दै.संतसूर्य मंगळवेढा, वगैरे वगैरे मधून सातत्याने लिखाण, अनेक दिवाळी अंक, मासिकातून, पाक्षीकातून, साप्ताहिका मधून कथा, कवीता, चारोळ्या, लेख, बातमी, पुस्तक परीक्षण, प्रवास वर्णन, आभिप्राय,आदि लिखाण सातत्याने प्रसिद्घ होत असते.पुणे एक्स्प्रेस न्यज चैनल, ईगल न्यूज़ चैनल, जय मल्हार न्यूज़ चैनल, रामदिन न्यूज़ चैनल, धनगर शक्ती न्यूज़ चैनल, अहिल्या वार्ता न्यूज़ ,वगैरे वगैरे चैनल वर सातत्याने लिखाण चालू असते.
भारत कवितके यांच्या वाढदिवसा निमित्त समाजाच्या विविध स्तरातून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे. १०००पेक्षा जास्त पुरस्कार मिळाल्याने भारत कवितके यांचे नाव येत्या डिंसेबर अखेर महाराष्ट्र रेकार्ड आफ बुक मध्यें नोंद होत आहे.सर्वच संपादकांशी, प्रतिनिधीशी भारत कवितके यांचे चांगले संबंध आहेत.
Leave a reply