राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील कोंढवड येथील शिवांकुर विद्यालय या शाळेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त केंदळ येथील श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे विठू माऊलीचा गजर करत व विट्ठल रखुमाई तसेच वारकऱ्यांच्या वेशभूषेत बालकांनी बालदिंडी काढून विठू माऊलीचे दर्शन घेतले. संत ज्ञानेश्वर, मुक्ताई, सोपानदेव, निवृत्तीनाथ, संत तुकाराम,संत एकनाथ,संत नामदेव या सर्व संतांची मांदियाळीच जणू केंदळ येथे एकत्रित सर्वांना पाहायला मिळाली.
कमरेवरती हात ठेवून विठुरायाचे ते सावळे, सुंदर, मनोहर आणि साजिरे स्वरूप त्याचबरोबर रुक्मिणी मातेचे ते अलौकिक रूप पाहून साक्षात पंढरी संकुलामध्ये अवतरल्याचा भास सर्वांना होत होता. शिवांकुर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची भगवी पताका हातात घेऊन डोक्यावर तुळस आणि टाळ मृदुंगाच्या ठेक्यात विठू नामाच्या गजराने केंदळ येथील सर्व परिसर दुमदुमून सोडला. मानवी मनोऱ्यातून साकारलेले विठ्ठल-रूखमाई सोबतचे सर्व संतांचे दर्शन, रिंगण, फुगडी, पावली अशा प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण व वैविध्यपूर्ण पारंपरिक खेळांनी बालचुमुंनी सर्वांची मने वेधून घेतली. सर्व शिक्षक वृंद, सर्व विद्यार्थी व गाडीचालक यांनी मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी देवतांचे दर्शन घेतले. सर्व विद्यार्थी यांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला.
या दिंडी सोहळ्याचे आयोजन संस्थेचे संचालक डॉ.प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शना खाली मुख्याध्यापिका शेळके मॅडम सह शिक्षक खिलारी सर, तारडे सर, शिंदे सर, जाधव सर, धुमाळ सर, झुगे मॅडम, शिंदे मॅडम, धोंडे मॅडम, तारडे मॅडम, खडके मॅडम, ढोकणे मॅडम, बारवकर मॅडम, लांबे मॅडम, डौले मॅडम, फाटक मॅडम, रासने मॅडम, तमनर मॅडम, प्रियंका पांढरे (तमनर) मॅडम यांनी या बालदिंडी सोहळ्यासाठी अथक परिश्रम घेऊन दिंडी सोहळा उत्साहात पार पडला व विद्यार्थ्यांनी या दिंडीचा आनंद लुटला.
Leave a reply