Disha Shakti

Uncategorized

दिशा शक्ती न्यूज़च्या बातमीनंतर वनकुटे गावचे लोकनियुक्त सरपंच राहुल झावरे यांनी तात्काळ घेतली काळू नदी वरील पुलाची दखल

Spread the love

पारनेर प्रतिनिधी (गणेश पोकळे) : काल दिशा शक्ती न्यूज़ने पारनेर तालुक्यातील वनकुटे ढवळपुरी परिसरातील काळू नदीवरील पुलाला भगदाड पडल्याने वनकुटे व ढवळपुरी गावातील आदिवासी व स्थानीक ग्रामस्थांना 8 दिवसांपासून पुलावरून कठीण परिस्थितीतून प्रवास करावा लागत होता. परंतु दिशा शक्ती न्यूज़च्या माध्यमातून स्थानीक ग्रामस्थांच्या समस्या लक्षात घेता बातमी प्रदर्शित होताच वनकुटे गावचे लोकनियुक्त सरपंच यांनी काळू नदीवरील पुलाची तात्काळ दखल घेतली.

पारनेरचे आमदार निलेश लंके हे ठाकरवाडी येथे विकास कामांच्या उद्घाटनाच्या कामानिमित्ताने आले असता त्यांना सरपंच राहुल झावरे यांनी अतिवृष्टीमुळे पूल वाहून गेल्याचे निदर्शनास आणून दिल्याने व आदिवासी बांधवांच्या समस्या आमदार निलेश लंके यांच्यापुढे मांडल्या असता आमदार निलेश लंके तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी फोन करून तात्काळ काळू नदीवरील पुलाचे काम मार्गी लावण्याचे आदेश दिले. व तसेच वनकुटे गावचे सरपंच राहुल झावरे यांच्यावर पुलाची काम करून घेण्याची जबाबदारी टाकली असता सरपंच राहुल झावरे यांनी तत्काळ संबंधीतांकडून काम करून घेतले व वावरत फाटा ते वनकुटे हा रस्ता सुद्धा आमदार साहेबांनी बजेट निधीमध्ये काम मंजूर केले असून लवकरच आमदार निधीतून चार कोटी पन्नास लाख रुपये मध्ये पुलाचे काम सुद्धा करून घेण्यात येईल असे आश्वासन दिले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!