Disha Shakti

Uncategorized

दिव्यांग मंत्रालयाची घोषणा झाल्याबद्दल राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेच्यावतीने फटाक्यांची अतिशबाजी

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / धोंडीराम दिवे (दिशाशक्ती) : महाराष्ट्र राज्यामध्ये स्वतंत्र्य दिव्यांग मंत्रालयाची घोषणा झाल्याबद्दल राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना व दिव्यांग शक्ती सेवा संस्थाच्यावतीने राहुरी शनिचौक येथे जल्लोष करण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.भारतात दिव्यांगाचे स्वातंत्र मंत्रालय असणारे महाराष्ट्र पहिले राज्य असणार आहे. प्रहार दिव्यांग संघटनेची गेली 20 ते 25 वर्षांपासून सतत केलेली मागणी होती. या साठी या पूर्वी बरेच आंदोलने करावे लागले व बच्चु भाऊ कडू यांना बरेच गुन्हे अंगावर घ्यावे लागले परंतु शिंदे सरकारनी 100 दिवसात दिव्यांग स्वातंत्र मंत्रालय करण्याचा निर्णय घेतला. व त्याची घोषणा जागतिक दिव्यांग दिनी 3 डिसेंबरला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दिव्यांगांचे प्रश्‍न सोडविणारे दिव्यांग हृदयसम्राट माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांचे विशेष आभार मानले. उपस्थित दिव्यांग बांधवांना व शनी मंदिर परिसरातील भाविकांना मोतीचूर लाडू वाटप करण्यात आले तसेच फटाक्यांची अतिशबाजी करत दिव्यांग बांधवानी आनंद व्यक्त केला. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

सदरील कार्यक्रम हा आनंदमय वातावरणात संपन्न्न झाला. राहुरी प्रहार तालुकाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी सांगितले स्वातंत्र दिव्यांग मंत्रालय झाल्यावर प्रत्येक जिल्यात दिव्यांग भवन व पूर्वसन केंद्र होणार आहे त्यामुळे दिव्यांगाचे प्रश्न सुटणार आहे. या वेळी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक म्हाळु पाचरणे साहेब, तालुका सल्लगार सलीम भाई शेख, तालुका सचिव योगेश लबडे, तालुका समन्व्यक ह.भ.प. नानासाहेब शिंदे, रवींद्र भुजाडी, शाखा अध्यक्ष बाबुराव शिंदे सर, सारंधर दरंदले,शाखा अध्यक्ष सुरेश दानवे, शाखा अध्यक्ष दत्तात्रय भाऊ खेमनर,उपाध्यक्ष आदिनाथ महाराज दवणे, शाखा सचिव मुसळे काका, राहुरी शहर सचिव जुबेर मुसानी, मुस्ताक शेख, मच्छीद्र जाधव,विष्णू ठोसर, सुखदेव कीर्तने रवींद्र उगलमूगले, कागले मामा,अरुण पटारे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी म्हणाले की, राज्यात दिव्यांगांचे प्रश्‍न गंभीर बनले होते. दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. तर दिव्यांगांना सुखी, समाधानाने जीवन जगता येणार असून, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये देखील वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितलेउपस्थितीता चे आभार सलीम भाई शेख यांनी मानले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!