Disha Shakti

सामाजिक

चिखलठाण येथे रमजान ईद (ईद उल फित्र) मोठ्या उत्साहात संपन्न

Spread the love

अ.नगर प्रतिनिधी / शेख युनूस : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथे रमजान ईद मोठ्या थाटामाटात व शांततेत संपन्न करण्यात आली. रमजान ईद ही मुस्लिम बांधवासाठी वर्षातील एक मोठा सण मनाला जातो. मुस्लिम बांधवासाठी वर्षाचे बारा महिने त्यातील नववा महिना म्हणजे रमजान ईद ईद उल फित्र होय. रमजान ईद सणाची सुरुवात ही चंद्र दर्शनानं होते. रोजा म्हणजे रमजान व्रत एक महिना उपवास ठेवण्यात येतात. मुस्लिम बांधव, लहान, मोठे, आबाल व्रद्ध हे रमजानचे रोजे करतात. रोजे हे सूर्योदया पासून ते सूर्योस्ता पर्यंत मुस्लिम बांधव काहीच खात पीत नाही. निर्वेसनी राहून उपवास रोजे ठेवतात. रमजान महिन्यात रोजे ठेवले म्हणजे माणसाची सर्व पापे, गुन्हे जळून जातात असे मानले जाते.

रोजांची सांगता रमजानच्या ईद सणाच्या दिवशी होते. रोजामुळे आरोग्याचा विचार तर आहेच शिवाय वर्षभर आपले आचार विचार, संयमीत पवित्र राहावेत यासाठी रोजे असतात. गोरगरीबाची भूक काय असते याची प्रत्येक मनुष्याला जाणीव असावी हाही एक हेतू या उपवासाच्या मागे असतो. संपूर्ण महिना उपवासाच्या रोजाच्या पवित्र बंधनात राहून महिन्याला निरोप देताना एक महिना सत्कर्म करायची संधी अल्ल्हाने प्राप्त करून दिली.

रमजानची रोजे उपवास संपताच दुसऱ्या दिवशी ईद म्हणजेच ईद उल फित्र साजरी करण्यात येते. ईद उल फित्रच्या दिवशी नमाज पठण करण्यापूर्वी प्रत्येक मुस्लिम बांधवाने विशेषतः श्रीमंतानी आपल्या मिलकतीचा काही भाग बाजूला काढून तो गरीब, गरजूना द्यान्यात येतो. रमजान ईद च्या दिवशी नमाज झाल्यावर सर्व मुस्लिम बांधव एकमेकांना आलीगन गळा भेट देतात. घरोघरी जाऊन रमजान ईद च्या शुभेच्छा देतात तसेस शीरखुर्मा, गुलगुले, गोड प्रसाद एकमेकांना खाऊ घालतात. रमजान ईद हा सण संयम, समानता, दया, करुणा, प्रेम, यांचा संदेश देणारा सण आहे.

यावेळी उपस्थितीत हाजी गणिभाई, मौलाना नासीर भाई, हाजी जमालभाई, हाजी खालीलभाई, मोहंमद भाई, अकबर भाई, बाबाजान शेख, मौलाना उबेदभाई, मौलाना मुसाभाई, सादिकभाई बोर्डी बिल्डर, जुबेर भाई, रफीक शेठ शेख चिकन, जावेद भाई, फारूकभाई, जैनुभाई, सकीलभाई, बाबुलाल शेख साहेब, सय्यद शेख, राष्ट्रवादी तालूका युवक कार्यकर्ते इसाक सय्यद, सलमान सय्यद, अहमदनगर पत्रकार युनूस शेख, नदीम शेठ, आसिफ शेख, नाजीम भाई आदी मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत तसेच राहूरी पोलीस निरीक्षक डांगे साहेब यांच्या संपर्कात भ्रमनध्वनीद्वारे चिखलठाण येथे रमजान ( ईद उल फित्र) मोठया थाटामाटाततसेच शांततेत संपन्न करण्यात आली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!