पळशी प्रतिनिधी / काकासाहेब खाडे :- ०८/१२/२०२२ शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी केल्याबद्दल सात डिसेंबर रोजी सशस्त्र सेना झेंडा दिवसाचे औचित्य साधून शैक्षणिक क्षेत्रातील बांधिलकी जोपासणाऱ्या, विद्यार्थी प्रिय,कर्तव्यदक्ष शिक्षिका अशा अनेक संबोधनांनी सन्मानित असणाऱ्या माण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (रानमळा) येथील उपक्रमशील व जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराच्या मानकरी असणाऱ्या सौ.वैशाली मोहन खाडे यांना कोरोनासारख्या महाभयंकर परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन-ऑफलाईन शिक्षण,तसेच वेगवेगळे तालुका व जिल्हा स्तरांवरील समाजोपयोगी कार्यक्रम वर्षभर या शाळेमध्ये सुरू करून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या कलेचा ध्यास घेण्यासाठी विविध शालेय उपक्रमांतर्गत तालुका स्तरीय तसेच जिल्हा स्तरांवरील असे विविध कार्यक्रम या शाळेत सौ.वैशाली खाडे यांनी त्यांच्या संयोजनातून पार पाडलेले आहेत.
त्यांच्या याचं शैक्षणिक क्षेत्रातील सामाजिक कार्याची दखल घेत त्यांनी राज्याचा तसेच देशाचा नावलौकीक वाढवल्याबद्द त्यांना सातारा जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी मा.श्री.जीवन गलांडे, सातारा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कमांडर मा.श्री.विजयकुमार पाटील,सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मा.श्री रवींद्र इथापे,वरिष्ठ लिपिक मा. श्री.विद्याधर ताटे यांचेकडून (गुण गौरव सर्टिफिकेट, दहा हजार रुपयाचा चेक,शाल, श्रीफळ,व महाराती महाराष्ट्राचे भाग १,२,व ३) इ. पुरस्काराचे स्वरूप असणारा सैनिक कल्याण विभाग, पुणे (महाराष्ट्र राज्य) यांच्याकडून विशेष गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा मधील संपूर्ण स्टाफ उपस्थित होता. त्यांच्या उत्तुंग यशाच्या कामगिरीबद्दल संपूर्ण पळशी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील सर्वचं स्तरांतून आदर्श शिक्षिका सौ.वैशाली खाडे यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.