Disha Shakti

Uncategorized

भास्कर नाना मासाळ यांनी देवगड येथे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या समोर जागरणाचे बोल केले सादर

Spread the love

प्रतिनिधी / महेश मासाळ : वाघ्या मुरळी परिषदेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री भास्कर नाना मासाळ यांच्या स्वर मल्हार जागरण गोंधळ पार्टी खिर्डी कडून देवगड संस्थानचे बाबाजी गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या समोर देवगडचा पोवाडा व दत्ताचे उंबराचे गाणे सादर करण्याची नामी संधी प्राप्त झाली होती. दत्तजयंतीच्या सप्ताहाची दि.2 डिसेंबर रोजी सायंकाळची दुसऱ्या दिवसाची पंगत बोधेगाव येथील होती.

या पंगतीच्या सानिध्यातून संत किसनगिरीजी बाबा भक्त मंडळ बोधेगाव यांनी श्री भास्कर नाना मासाळ यांना पंगतीच्या गाडीच्या समोर पारंपरिक पद्धतीने जागर करण्याची इच्छा व्यक्त केली, भास्कर नाना यांनी कुठलाही विचार न करता होकार देऊन देवगड येथे कार्यक्रम केला, गुरुवर्य बाबाजींनी कार्यक्रमाचे बोल ऐकून खूप आनंदित झाले होते ,व कौतुकही केले, तदनंतर जागरण गोंधळ पार्टीचे बाबाजींनी श्रीफळ देऊन सत्कार केला. या कार्यक्रमासाठी वाघ्या मुरळी परिषदेचे नगर जिल्हा अध्यक्ष श्री भास्कर नाना मासाळ, श्री दत्तात्रय मासाळ, श्री.पांडू भाऊ खेमनार, श्री.सागर भाऊ मासाळ, प्रमोद भाऊ पारखे, काळू कांगुने तसेच इंडिया सुपर चॅनलचे प्रतिनिधी महेश मासाळ आदी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!